एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार गेल्याने महाविकास आघाडी धोक्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी नेते आपले सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. (devendra fadanvis call raj thackeray)
अशात सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी बजावली आहे. आमदारांनी १२ जूलैपर्यंत आपली बाजू मांडावी असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. पण तोपर्यंत शिवसेनेला बंडखोर आमदारांवर कारवाई करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर भाजप आता सत्ता स्थापनेसाठी सक्रीय पावले उचलताना दिसत आहे.
राज्यात ३० तारखेला बहुमत चाचणी होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंसोबत फोनवर चर्चा केली आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी देवेंद्र फडणवीसांनी मनसेची मदत मागितली आहे. तसेच राज ठाकरे यांनीही मदत देण्यास होकार दिला. मनसेचा एकमेव आमदार राजू पाटील हे भाजपला मतदान करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मंगळवारी रात्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी केली आहे.३० तारखेला बहुमत चाचणीसाठी सरकारला आदेश देण्यात यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे केली होती.
आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही त्याबाबत निर्णय घेतला आहे. ३० तारखेला महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता मतदार होणार आहे. यावेळी सर्व आमदार मतदान करण्यासाठी विधानसभेत येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
एका युक्तीने पालटले व्यक्तीचे नशीब, फळं विकून उभी केली तब्बल 300 कोटींची कंपनी, वाचा यशोगाथा
काशी विश्वनाथ मंदीरातून साईबाबांच्या मुर्त्या हटवा, महंतांचा आदेश; वाचा नेमकं काय घडलं..
राणादासाठी पाठकबाईंनी घेतला खास उखाणा; म्हणाली, फुलावर फिरत असतो भुंगा…