Share

“स्वातंत्र्यापासून महाराष्ट्राला लाभलेल्या राज्यपालांपैकी हा एक नंबरचा बोगस राज्यपाल”

रविवारी (काल) विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली लढाई शिंदे सरकारनं जिंकली आहे. तर आज शिंदे सरकारची सर्वात मोठी अग्निपरीक्षा आहे. याचे कारण असे की, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभागृहात बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे.

तर दुसरीकडे या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या टीकेचे धनी बनले आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने ठाकरे सरकारच्या विरोधात पाहायला मिळाले.

अनेकदा मागच्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष देखील केले होते. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन करणारे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी कोश्यारी यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते याबाबत रविवारी माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना भुयार यांनी कोश्यारी यांना चांगलेच धारेवर धरले. ‘कोश्यारी म्हणजे स्वातंत्र्यापासून महाराष्ट्राला मिळालेल सर्वात बोगस राज्यपाल असं म्हणत भुयार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ‘हे राज्यपाल कुठून आले, कसे आले, कोणी आणले त्यांचं त्यांनाच माहिती, असा टोला देखील त्यांनी लगावला.

दरम्यान, पुढे बोलताना भुयार यांनी म्हंटलं आहे की, “जेवढे काही राज्यपाल महाराष्ट्राला स्वातंत्र्यापासून लाभले आहेत, त्यातला एक नंबरचा बोगस राज्यपाल म्हणजे हा राज्यपाल आहे. त्याच्यामुळे याच्यावर न बोलेलं बरं,’ असं म्हणत भुयार यांनी यावेळी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे.

तर दुसरीकडे अलीकडेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील कोश्यारी यांच्यावर टीका केली होती. ‘तब्बल1990 सालापर्यंत मी वेगवेगळ्या पदावर शपथा घेतल्या आहेत. पण, आजपर्यंत मला कुठल्याही राज्यपालांनी पेढा भरवला नाही. यापूर्वी, ज्यांनी शपथ घेतली, त्यांना फुलांचा गुच्छही देताना मी पाहिलं नाही. यावेळी त्यांनी दिला याचा आनंद आहे. राज्यपालांनी गुणात्मक बदल केलाय, असं पवारांनी म्हंटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now