Share

कुत्र्यापासून वाचण्यासाठी डिलीव्हरी बॉयने उचलले धक्कादायक पाऊल, उपचारादरम्यान मृत्यु 

हैदराबादमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारलेल्या डिलिव्हरी बॉयचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्विगी डिलिव्हरी बॉय रिजवान एका अपार्टमेंटमध्ये जेवण देण्यासाठी गेला होता. यादरम्यान कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला.

कुत्र्यापासून वाचण्यासाठी रिझवानने अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून बऱ्याच जणांना धक्का बसला आहे.

हे प्रकरण हैदराबादच्या पॉश बंजारा हिल्स भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय मोहम्मद रिजवान हा बंजारा हिल्स येथील लुंबिनी रॉक कॅसल अपार्टमेंटमध्ये जेवण देण्यासाठी गेला होता. त्याने फ्लॅटचा दरवाजा ठोठावला, तेव्हा ग्राहकाचा पाळीव कुत्रा (जर्मन शेफर्ड) त्याच्यावर भुंकायला लागला. तो कुत्रा जवळ येताच मोहम्मद घाबरला आणि त्याने आपला जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. तो खुप घाबरला होता.

भीतीपोटी रिझवानने अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली आणि तो खाली आदळला. या घटनेनंतर रिझवानला निजाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (NIMS) मध्ये नेण्यात आले आणि गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बंजारा हिल्सचे पोलिस निरीक्षक एम नरेंद्र यांनी सांगितले की, रिझवान हे पार्सल ग्राहकाला देत असताना जर्मन शेफर्ड घरातून बाहेर आला आणि त्याने रिझवानवर जोरदार हल्ला केला. हल्ल्याच्या भीतीने रिजवानने जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर कुत्रा त्याच्या मागे लागला. त्यानंतर रिझवानने अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.

पुढे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विगी डिलिव्हरी बॉय मोहम्मद रिझवानचा शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या
सिकंदरच्या कुस्तीचा निकाल देणाऱ्या पंचांना फोनवरून धमकी; सिंकदर शेख म्हणाला..
महाराष्ट्र केसरीत अन्याय झालेल्या सिकंदरने सोडले मौन; चाहत्यांना आवाहन करत म्हणाला आता यापुढे…
कोविड लसीच्या बूस्टर डोसमुळे हार्टॲटॅकच्या घटनांमध्ये झाली वाढ? अखेर समोर आले सत्य
कोविड लसीच्या बूस्टर डोसमुळे हार्टॲटॅकच्या घटनांमध्ये झाली वाढ? अखेर समोर आले सत्य

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now