काही दिवसांपूर्वी एका टिव्ही शोमध्ये बोलत असताना भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नुपूर शर्मा यांनी पैंगबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशभरात गदारोळ माजला. सहा वर्षांसाठी त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
तसेच भाजप दिल्ली मीडियाचे प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनाही निलंबित करण्यात आले आहे. याचबरोबर मुस्लिम समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. प्रेषित पैगंबर यांच्याविषयीच्या वादग्रस्त विधानानंतर नुपूर शर्मा यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
अशातच या वादात आता भीम आर्मीने उडी घेतली. नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा भीम आर्मीने केली होती. भीम आर्मीचे प्रमुख नवाब सतपाल तन्वर यांनी ही घोषणा केली होती. तसेच कानपूर हिंसाचाराची सुत्रधार नुपूर शर्मा असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
तर आता नवाब सतपाल तन्वर यांच्या अडचणींमद्धे वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे. नवाब सतपाल तन्वर यांनी दिलेल्या घोषणेनंतर पोलिसांनी अॅक्शन घेतली आहे. तन्वर यांना पोलिसांनी अटक केली आहे. तन्वर यांना गुरुग्राममधून अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त केपीएस मल्होत्रा यांनी दिली आहे.
दरम्यान, याबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी तन्वर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 153A, 504, 506, 509 अंतर्गत विशेष सेल पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता. तर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे सध्या तन्वर हे अडचणीत सापडले आहेत.
तर दुसरीकडे, नुपूर शर्मांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हा मुद्दा इतका पेटला आहे की जागतिक पातळीवर पोहोचला आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर अनेक मुस्लिम देशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक देशांनी भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पॉवरफुल्ल अदानी बारामतीत! “दोन लुटारू भाई, अवघा देश लुटून खाई”; सदाभाऊंची जहरी टीका
IPLचे विजेतेपद पटकावल्यामुळे नाही तर, ‘या’ खास कारणामुळे पंड्याला केलय टिम इंडीयाचा कॅप्टन
मुकेश अंबानींचे पूर्ण कुटुंब खाते ‘या’ पद्धतीचे जेवण, कुकला मिळतो ‘इतका’ पगार, वाचून हैराण व्हाल
संगीतकार अतुलच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, घेतली ‘ही’ ड्रीम बाईक, किंमत वाचून अवाक व्हाल