दिल्लीतील गाझीपूरमध्ये एका ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे संपूर्ण प्रकरण बुधवारी रात्रीचे असून, दोन जणांनी महिलेचे अपहरण करून तिला आपल्या वासनेची शिकार बनवले आहे. या प्रकरणी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. (delhi auto riksha driver rape women)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडितेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यानंतर डॉक्टरांनी तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल केले, जिथे पीडितेवर उपचार करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गाझीपूर पोल्ट्री मार्केटच्या गेट क्रमांक एकजवळ पडलेली आढळली. रात्री उशिरा एका अज्ञात महिलेचा पीसीआर कॉल आल्यानंतर तिला प्राथमिक उपचारासाठी लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पीडितेला अधिक उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले.
उपायुक्त प्रियंका कश्यप यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू आहे. यासोबतच आरोपींना पकडण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या एफआयआरनुसार, ही महिला पोल्ट्री मार्केटच्या गेट क्रमांक एकजवळ सापडली. पीडितेच्या तोंडातून रक्त वाहत होते. त्याच्या प्रायव्हेट पार्टलाही जखमा झाल्या आहेत.
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला भिक मागत असताना दोन अज्ञात रिक्षाचालकांनी तिला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दोन्ही तरुणांनी तिला अज्ञातस्थळी नेले.
तिथेही तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडित तरुणी गाझीपूरमध्ये भीक मागायची आणि ती तिच्या पतीसोबत सीमापुरी येथे राहाते, असे सांगितले जात आहे. पोलिसांच्या पथकांनी अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यासह परिसरात धावणाऱ्या १०० हून अधिक रिक्षाचालकांची चौकशी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
स्टाईलिश लूक, जबरदस्त ऍब्स, शाहरुख खानने शेअर केला ‘पठाण’चा पहिला लूक; कॅप्शनने लोकांना लावले वेड
“काश्मिरी पंडितांवर अत्याचार दहशवाद्यांनी केला होता, त्यासाठी मुस्लिमांना दोष देणं योग्य नाही”
हे फक्त धोनीच करू शकतो! पहिल्याच सामन्यात केला आगळा वेगळा विक्रम, सचिन-द्रविडलाही टाकले मागे