Share

केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, देहू संस्थानने ‘तुका म्हणे’ शब्दांवर घेतला आक्षेप; प्रकरण पोलिसांत…

अभिनेत्री केतकी चितळे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेबसूकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकांनी तिला विरोध केला आहे. (dehu sansthan on ketki chitale)

केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे. राजकीय वर्तुळातही या प्रकरणावरून वातावरण तापलेले आहे. अनेक नेत्यांनी तिच्या पोस्टला विरोध केला आहे. असे असताना आता देहू संस्थानने सुद्धा केतकीच्या पोस्टवर आक्षेप घेतला आहे. तसेच केतकीवर यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत देहूरोड पोलिस ठाण्यात पत्रही दिलं आहे.

तुका म्हणे ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची स्वाक्षरी आहे, असे पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

केतकीने तुका म्हणे शब्दांचा वापर करुन विटंबना, वादग्रस्त लिखाण केले आहे. श्री संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. तुका म्हणे ही संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची स्वाक्षरी आहे, असे पत्रात म्हटलेले आहे.

तसेच तुकोबाच नव्हे, तर देशातील इतर संतांच्या नावाचा वापर यासाठी करु नये. तसेच असे लिखाण करणाऱ्या व्यक्तीवर कारदेशीर कारवाई करण्यात यावी, असे म्हणत याप्रकरणी केतकीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देहू संस्थानाने केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी केतकीविरोधात ठाण्यातील कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिला अटकही करण्यात आली आहे. केतकीने शरद पवारांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने देवेंद्र फडणवीसांसह राज ठाकरेंनी देखील तिला विरोध केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
कम्युनिस्ट नेता असणाऱ्या शिक्षकाने तब्बल ६० विद्यार्थीनींचे केले लैंगिक शोषण; देशात खळबळ
मृत्यूनंतर ‘एवढी’ संपत्ती मागे सोडून गेला क्रिकेटपटू सायमंडस; आकडा वाचून डोळे पांढरे होतील
केतकीच्या बाजूने चित्रा वाघ मैदानात; शिवीगाळ आणि धमक्या देणाऱ्यांवर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now