पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे सुरुवातीचे कल आता हाती आले असून चित्र हळू हळू स्पष्ट होऊ लागलं आहे. यात ‘पणजी’च्या निकालाकडे संपूर्ण देशाच विशेष लक्ष लागलेलं आहे. याचे कारण असे की, तिकीट न दिल्याने गोव्यात भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या कलांमध्ये उत्पल हे आघाडीवर होते. मात्र नंतर उत्पल पर्रीकर हे पिछाडीवर पडले. आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अवघ्या 710 मतांनी त्यांचा पराभव झाला आहे. उत्पल यांच्या विरोधात उभे असलेले बाबूश मॉन्सेरात हे विजयी झाले आहेत.
दरम्यान, गोव्यात जागा वाटपाच्या सुरुवातीलाच पणजीत जागेसाठी गोंधळ सुरु होता. उत्पल पर्रीकर यांना भाजपने उमेदवारी दिली नाहीतर ते बंडखोरीच्या तयारीत होते. पणजी मतदार संघ हा दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा होता. भाजपने (BJP) पणजीतून उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी नाकारली. आणि त्यांच्या त्याऐवजी काँग्रेसमधून आलेल्या बाबूश मॉन्सेरात यांना देण्यात आली.
तर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आघाडी मारली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा शानदार विजयाकडे असून मणिपूर, गोवा आणि उत्तराखंडमध्येही भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पंजाबमध्ये आप पक्ष बहुमताच्या दिशेने आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण ४०३ जागांवर मतदान झाले आहे. पैकी सरकार स्थापनेसाठी २०२ एवढ्या बहुमताची गरज लागणार आहे.
दरम्यान, भाजपाला बहुमत मिळाल्यास योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी कायम राहतील हे स्पष्ट आहे. पण यानिमित्ताने अजून एक विक्रम योगी आदित्यनाथ यांच्या नावे होणार आहे. ते म्हणजे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मान ३७ वर्षानंतर त्यांना मिळणार आहे.
राज्यात १९८५ नंतर जनतेने कोणत्याच पक्षाला दुसऱ्या वेळी सत्ता दिलेली नाही. १९८५ मध्ये काँग्रेसच्या नारायण दत्त तिवारी यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर मात्र कोणालाही हे जमलं नाही. जर योगी आदित्यनाथ पुन्हा राज्याचे प्रमुख झाले तर सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे ते पाचवे मुख्यमंत्री ठरतील.
महत्त्वाच्या बातम्या
गोव्यातील शिवसेनेची स्थिती पाहून सोमय्यांचा राऊतांना चिमटा, म्हणाले, ‘गोव्यात शिवसेना कुठं आहे?’
योगी आदित्यनाथांचा जलवा; तब्बल ४५ वर्षांनंतर पहिल्यांदाच केला ‘हा’ विक्रम
देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बार फुसका? राष्ट्रवादी काँग्रेसने केला मोठा खुलासा
फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बमध्ये उल्लेख केलेले सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब? कार्यालयाला टाळं