Share

दिपीकाला पाहताच स्वत:वरचे नियंत्रण गमावून बसला आणि बेभान होत किस करू लागला; पहा व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika padukone) सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (cannes film festival) आपल्या सौंदर्याने सर्वांना प्रभावित करताना दिसत आहे. या अभिनेत्रीचा या वर्षी ज्युरी सदस्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे आणि दररोज दीपिकाचे अनेक आकर्षक लूक पाहायला मिळत आहेत जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

अशा परिस्थितीत कान्सच्या रेड कार्पेटवरून (red carpet) दीपिकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो चर्चेचा विषय ठरला आहे. खरंतर दीपिकाची फॅन फॉलोइंग जगभरात आहे. दीपिका इतकी सुंदर आहे की ज्याचीही तिच्यावर नजर असते तो काही वेळ फक्त अभिनेत्रीकडे पाहत राहतो किंवा दिपीकाची एक झलक पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तडफडत असतो.

अशीच काही फॅन फॉलोइंग कान्सच्या रेड कार्पेटवरही पाहायला मिळाली. हॉलिवूड स्टारची नजर दीपिकावर पडताच ही व्यक्ती दीपिकाला भेटल्याशिवाय राहू शकली नाही. दीपिकासाठी हे थोडे अनपेक्षित होते आणि चाहत्यांसाठीही हे अनपेक्षित होते. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर खुप व्हायरल होत आहे.

दीपिका रेड कार्पेटवर पापाराझींसाठी पोज देण्यात व्यस्त असताना अचानक मधूनच एक व्यक्ती आली. याआधी दीपिकाला काही कळायच्या आधीच त्या व्यक्तीने दीपिकाला किस करून मिठी मारायला सुरुवात केली. अशा परिस्थितीत, दीपिकाने ही परिस्थिती अत्यंत हुशारीने हाताळल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.

दीपिका सुरुवातीला थोडी अस्वस्थ दिसली आणि ती या व्यक्तीचा हात तिच्या कंबरेवरून काढताना दिसली, पण दीपिकाने त्याला ओळखताच तिने त्याला मिठी मारली. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. यादरम्यान दीपिका पदुकोण लाल रंगाच्या डीप नेक स्ट्रॅपी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

अभिनेत्रीच्या या लूकमध्ये डायमंड नेकलेसची भर पडत होती. दरम्यान, दिपीकाच्या वर्क फ्रंडबद्दल बोलायचे झाले तर दिपीका शाहरूखसोबत त्याचा आगामी चित्रपट पठाणमध्ये दिसणार आहे. चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शाहरूख आणि दिपीकाच्या या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. दिपीका सोशल मिडीयावरही खुप सक्रीय असते.

महत्वाच्या बातम्या
‘तो’ जोरजोरात किस करत होता.. दिपीका हात हटवत होती; पहा कान्सच्या रेड कार्पेटवरचा तो व्हायरल व्हिडीओ
इंग्रजांच्या काळातील ‘या’ निर्णयामुळे ज्ञानवापी केसला नवे वळण, हिंदू संघटनांनी केला मोठा दावा
‘मराठा आरक्षणाबाबत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी?’ मनसेचा संतप्त सवाल
मुस्लिम मुलांना शाळेत खाऊ घातलं डुकराचं मांस, उडाला गोंधळ; वाचा नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now