सध्या शकुन बत्राच्या ‘गेहराईयां’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी महत्वाची भूमिका साकारलेल्या हा चित्रपट चांगलाच हिट होत असल्याचे म्हटले जात आहे. तर अनेक लोक ‘गेहराईयां’वर टीका करत असले तरी काही लोकांना हा चित्रपट आवडला आहे. (deepika padukone on physical relationship)
तसेच अलीकडे दीपिका पदुकोणनेही या चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित केली होती. दरम्यान, दीपिकाची एक जुनी मुलाखत चर्चेत आहे, ज्यामध्ये तिने एक्स बॉयफ्रेंडने नात्यात फसवणूक केल्याबद्दल बोलले होते. दीपिकाने त्या मुलाखतीत सांगितले होते की तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिची कशी फसवणूक केली होती.
दीपिकाने सांगितले होते की तिने तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडले होते. ही फसवणूक दीपिकाला सहन झाली नाही आणि तिने नाते तोडले. दीपिका पदुकोण रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर तिने काही काळ विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्यालाही यालाही डेट केले. दीपिकाने सिद्धार्थसोबतच्या नात्याबद्दल कधीही काहीही सांगितले नाही.
माजी प्रियकराकडून मिळालेल्या फसवणुकीवर दीपिका म्हणाली होती, सेक्स माझ्यासाठी फक्त शारीरिक नाही. त्यात भावनांचाही समावेश होतो. प्रेमात शारिरीक आणि मानसिक मी रिलेशनशिपमध्ये असताना, मी कधीही फसवले नाही किंवा भरकटले नाही. जर मी मूर्ख ठरणार आहे, तर मी नातेसंबंधात का असेन? त्यापेक्षा अविवाहित राहणे आणि मजा करणे चांगले आहे. पण सगळ्यांनाच असं वाटत नाही.
तसेच कदाचित म्हणूनच मी भूतकाळात दुखावले गेले आहे. पहिल्यांदा जेव्हा त्याने माझी फसवणूक केली गेली तेव्हा मला वाटले की या नात्यात किंवा माझ्यात काहीतरी चूक आहे. पण जेव्हा एखाद्याला याची सवय होते तेव्हा तुम्हाला कळते की समस्या चूक तुमच्यात नाही, तर तुम्ही निवडलेल्या व्यक्तीत असते. प्रेमात मिळालेल्या शारीरीक आणि मानसिक धोक्यामुळे त्याचा तुमच्यावर गंभीर परीणाम होत असतो, असे दीपिकाने म्हटले आहे.
दीपिकाच्या म्हणण्यानुसार, तिने तिच्या माजी प्रियकराला रंगेहाथ पकडले आणि तरीही त्याला दुसरी संधी दिली, हा तिचा मूर्खपणा होता. दीपिका म्हणाली होती की, मीच मूर्ख होते ज्याने त्याला दुसरी संधी दिली कारण तो माझ्याकडे प्रेमाची भीक मागत होता. माझ्या आजूबाजूचे लोक मला सांगत होते की तो अजूनही चांगला नाहीये.
ब्रेकअपनंतर दीपिका पदुकोण खूप कठीण टप्प्यातून गेली होती. ती डिप्रेशनमध्ये गेली होती. पण कालांतराने तिने स्वतःची काळजी घेतली आणि पुढे जाऊ लागली. पण २०१२ मध्ये दीपिकाच्या आयुष्यात अभिनेता रणवीर सिंगची एन्ट्री झाली. दोघेही एकमेकांना पसंत करू लागले आणि त्यानंतर २०१७ मध्ये दीपिकाने रणवीरसोबतचे नाते अधिकृत केले. दीपिका आणि रणवीरचे नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न झाले.
महत्वाच्या बातम्या-
शेजाऱ्यांच्या ‘या’ भितीमुळे कच्चा बदाम गाणाऱ्या भुबन यांनी भुईमुग विकणे केले बंद, वाचून अवाक व्हाल
शिवसेना, राष्ट्रवादी ‘यासाठी’ नितीश कुमारांना देणार पाठिंबा, करणार मोठा धमाका
‘पतीला डावलून पर पुरुषाला सतत फोन करणे म्हणजे वैवाहिक क्रूरताच’, हायकोर्टाची टिप्पणी