बॉलिवूडचे कलाकार हे त्यांच्या लाईफस्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या ड्रेसमुळे तर कधी त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींमुळे ते चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही त्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची खुप उत्सुकता असते. (deepika padukone bag hangover tablet)
तसेच बॉलिवूड अभिनेत्री काय करतात, काय खातात हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अनेक अभिनेत्री या त्यांच्या छोट्याशा बॅगमुळेही चर्चेत येतात. नक्की त्यात काय असेल, असा विचार चाहते करत असतात. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणही तिच्या बॅगमुळे चर्चेत असते.
आज आपण दीपिकाच्या बॅगमध्ये नक्की काय असते? हे जाणून घेणार आहोत. तिने स्वत:च याबाबत खुलासा केला होता. तिला तुम्ही बॅग काय काय गोष्टी ठेवत असतात? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने याबाबत खुलासा केला होता. हँगओव्हरपासून सुटका करण्यासाठी दीपिकाच्या बॅगेत एक खास औषध आहे, असे तिने सांगितले आहे.
दीपिका पदुकोणने सांगितले की, ती तिच्या बॅगमध्ये हँगओव्हरपासून सुटका करण्यासाठी एक खास औषध ठेवते. त्या औषधाचे नाव अलका सेल्टझर असे आहे. या हँगओव्हर रिलीफ टॅब्लेटमुळे डोकेदुखी, अंगदुखी, थकवा ही हँगओव्हरची लक्षणे कमी होतात.
तसेच औषधाशिवाय दीपिका पदुकोण माऊथ फ्रेशनर, पेन्सिल-डायरी देखील आपल्या बॅगेत ठेवत असते. दीपिकाने सांगितले की, हे तिच्यासाठी खूप महत्वाचे आहे. याशिवाय दीपिका तिच्या बॅगेत नेहमी सेफ्टी पिन आणि बँडेज ठेवते. ज्याची कधीही गरज पडू शकते.
बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या कान्समध्ये धमाल करत आहे. दीपिकाचे अनेक लूक समोर आले आहेत. अभिनेत्रीची प्रत्येक शैली चाहत्यांचे मन जिंकत आहे. कधी सिक्विन साडी तर कधी लाल गाऊन, दीपिकाने तिच्या प्रत्येक लूकने चाहत्यांना थक्क केले. अभिनयापासून फॅशनपर्यंत सर्वच बाबतीत दीपिका पहिल्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या-
IPL स्पर्धेतून बाहेर पडताच सुट्टी सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा, पत्नीसोबतचे रोमॅंटिक फोटो व्हायरल
एकेकाळी वेबसिरीजमधील बोल्ड भूमिकांवर टिका करणारी प्राजक्ता माळी आता मात्र स्वताच…
पुणे हादरलं! प्रियकरासोबत मिळून आपल्याच पोटच्या बाळाला कोंबलं शौचालयाच्या भांड्यात