बॉलिवूडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिपीका पादूकोनची तब्येत अचानक बिघडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दीपीकाच्या ह्रदयाचे ठोके अचानक वाढल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हैदराबादच्या कमिनेन हॉस्पिटलमध्ये सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. सांगितलं जात आहे की, दिपीकाचं हैदराबादमध्ये शुटींग सुरू होतं. शुटींग सुरू असताना तिची तब्येत अचानक बिघडली. अजूनतरी हॉस्पिटलमधून याबाबत कसलीही माहिती देण्यात आलेली नाही.
तिच्या तब्येतीबद्दल माहिती मिळताच चाहत्यांना धक्का बसला. दिपीका तिच्या आगामी चित्रपटात प्रभाससोबत दिसणार आहे. हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये हे शुटींग सुरू होतं. आता सध्या तिची तब्येत ठीक आहे अशी माहिती मिळाली आहे.
सूत्रानुसार, या अहवालावर दीपिका पदुकोणच्या टीमकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचे शूटिंग करत असताना अचानक तिला खूप अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. नंतर ती शूटिंगलाही परतली. अद्याप या गोष्टींबद्दल दीपिका पदुकोणच्या टीमकडून कोणतीही पुष्टी आलेली नाही.
आरोग्याच्या समस्येबाबत अद्यापही अंदाज लावला जात आहे. दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा आगामी चित्रपट ‘पठाण’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत शाहरुख खान काम करत आहे. दीपिकाने तिच्या करिअरची सुरुवात शाहरुख खानसोबत केली होती.
पुन्हा एकदा किंग खानसोबत काम करताना दीपिका खूप खूश आहे. ‘पठाण’ व्यतिरिक्त दीपिका हृतिक रोशनसोबत ‘फायटर’मध्ये दिसणार आहे. दीपिका प्रभाससोबत ‘प्रोजेक्ट के’मध्येही दिसणार आहे. याशिवाय दीपिका पदुकोण काही काळापूर्वी शकुन बत्राच्या ‘गेहराईयां’ चित्रपटात दिसली होती.
हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यामध्ये दीपिका पदुकोणने सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेसोबत स्क्रीन शेअर केली होती. गेल्या महिन्यात दीपिका पदुकोण कांस फिल्म फेस्टिव्हलमधून परतली होती. दीपिका पदुकोणने 11 दिवस चाललेल्या या महोत्सवात ज्युरीची जबाबदारी स्वीकारली. एकापेक्षा एक ड्रेस परिधान करून तिने रेड कार्पेटवर तिच्या सुंदरतेचा जलवा पसरवला होता.
महत्वाच्या बातम्या
‘या’ अभिनेत्रीने सुशांतवर लावले होते लैंगिक छळाचे आरोप, पण नंतर वेगळेच सत्य आले होते समोर
देहूतील मोदींच्या कार्यक्रमात अजितदादांना भाषण का करू दिले नाही; देहू संस्थानने सांगीतले सत्य, म्हणाले..
..अन् सासूचे निधन झाले तरी मी १५ मिनीटं हसत होते, अर्चना पूरण सिंगच्या वक्तव्याने सगळेच झाले हैराण
राज्यसभेत भाजपला जिंकवून देण्याचा मास्टर प्लॅन ‘या’ माजी शिवसैनिकानेच आखला; एकेकाळी होता ठाकरेंचा विश्वासू