Share

“शिंदेंनी मला शिवसेनेत आणलं, मुख्यमंत्र्यांनी मला शिकवण दिली, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?- दीपाली सय्यद

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. (deepali sayyed shocking tweet)

एकनाथ शिंदे यांच्या या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस आमदारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे नक्की पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती खुप अस्थिर झाली आहे. आमचा गट म्हणजे खरी शिवसेना असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. अशात शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी एक हैराण करणारं ट्विट केलं आहे. जे सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.

एकनाथ शिंदेंनी मला शिवसेनेत आणलं, उद्धव ठाकरेंनी मला शिकवण दिली. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? असं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे. त्यामुळे दीपाली सय्यद सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार की काय? अशी चर्चा सध्या रंगली आहे.

सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू, असे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले आहे.

https://twitter.com/deepalisayed/status/1539836668307546113

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थान सोडले आहे. यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. पण शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत, असे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-
शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, पण ‘ही’ अट; शिवसेनेची घोषणा
उद्धव ठाकरेंचाच एकनाथ शिंदेच्या बंडाला पाठींबा; ‘हे’ आहेत पुरावे
‘अशी कशी फुटून गेली वाघाची छाती, कारण द्यायचं हिंदूत्व, खरंतर ईडी काडीची भिती’, मनसेचा आरोप

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now