Share

“एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये जावे एवढी भाजपची लायकी नाही”

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. ते गुजरातमध्ये असून त्यांच्यासोबत ३० आमदार असल्याचीही चर्चा आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांचे हे बंड महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का असू शकतो असे म्हटले जात आहे. (deepali sayyad on eknath shinde)

सुरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे हे आमदारांसोबत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. भाजप नेत्यांचा एक गट एकनाथ शिंदेसोबत चर्चा करण्यासाठी रवाना झाल्याचेही म्हटले जात आहे.

या राजकीय घडामोडींवर शिवसेना नेतेही प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचा वाघ भाजपला झेपणार नाही, असे म्हणत दीपाली सय्यद यांनी ट्विटमधून भाजपला टोला लगावला आहे.

माननीय एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणणाऱ्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या IT CELL च्या लिंबु टिंबुनी सोशल मिडीयावर तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही, असे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड, संजय बांगर, आणि दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक प्रस्ताव दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी या प्रस्तावात केल्याचे म्हटले जात आहे.

तसेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असावेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून आपली वर्णी लावावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या प्रस्तावामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
फडणवीसांसोबत जाऊन उपमुख्यमंत्री होण्यापेक्षा सेनेत राहून मुख्यमंत्री व्हा, मी राजीनामा देतो; शिंदेंना ठाकरेंची आॅफर
मी राजीनामा देतो, तुम्ही मुख्यमंत्री व्हा; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंना आॅफर
११ वेळा लग्न केलं तरी महिलेला मिळाला नाही मनासारखा जोडीदार, आता म्हणतेय, एखादी व्यक्ती नक्की..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now