Share

ए भोगी, कुछ तो सीख हमारे योगी से, म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांना शिवसेनेचं उत्तर; म्हणाले, फडणवीस बायकोला…

राज्यात सध्या वेगवेगळ्या गोष्टींवरुन राज्याचे राजकारण तापलेले दिसून येत आहे. सत्ताधारी नेते आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. असे असताना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. (deepali sayyad criticize devendra fadanvis)

झाले असे की देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना दीपाली सय्यद यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. एका वृत्तवाहिनीशी दीपाली सय्यद यांनी संवाद साधला होता, त्यावेळी त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

ए भोगी, कुछ तो सीख हमारे योगी से, अशा पद्धतीने अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. यावर दीपाली सय्यद यांनी जोरदार टोला फडणवीसांना लगावला आहे. त्या म्हणाल्या, योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं. देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार का? असा सवाल दीपाली सय्यद यांनी उपस्थित केला आहे.

त्याआधी दीपाली सय्यद एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या होत्या. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दीपाली सय्यद यांनी किरीट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. किरीट सोमय्यांच्या जागी पंतप्रधान मोदी असते तरी गाडी फुटली असती, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले होते.

दीपाली सय्यद यांच्या या वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. कारण दीपाली सय्यद यांच्या वक्तव्याला भाजप विरोध करताना दिसून येत आहे. इतकंच नाही, तर दीपाली सय्यद यांच्याविरोधात पुण्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरुन वाद सुरु आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा वाचणार अशी घोषणा केली होती. पण त्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतलो. असे असताना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करणार यामुळे शिवसैनिकही चांगलेच आक्रमक झाले होते.

महत्वाच्या बातम्या-
औरंगाबादला जाताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेणार राज ठाकरे
कलिंगडमध्ये आहेत व्हाएग्राचे गुण; पुरुषांसाठी असलेले फायदे वाचून बसेल आश्चर्याचा धक्का
नवी मुंबईत तिरुपती देवस्थानला जागा देण्याच्या मागे शिवसेनेचा ‘हा’ मोठा राजकीय डाव? वाचा सविस्तर

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now