एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची भाजपशी जवळीक वाढताना दिसून येत आहे. असे असतानाच आता भाजप आणि शिंदे गटात वाद सुरु होताना दिसून येत आहे. (deepak kesarkar criticize rane sons)
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि राणे कुटुंबात पुन्हा एकदा वाद पाहायला मिळत आहे. दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते असल्याने ते शिंदे गटाची भूमिका मांडत असतात. अशातच त्यांनी राणे पुत्रांवर टीका केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नारायण राणेंची दोन्ही मुलं लहान असून त्यांना समज देण्याची गरज आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले होते. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. आता याला निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. सध्या त्यांचे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1547196032974352385
निलेश राणे हे अनेकदा ट्विट करत असतात. तसेच त्यांच्या टीका करण्याच्या पद्धतीमुळे ते चर्चेतही येत असतात. यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, राणेंची मुलं लहान आहे. त्यांना समजवायचं काम फडणवीस साहेब करतील. लहान मुलं ट्विट करतात, त्यांच्या ट्विटकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यानंतर आता निलेश राणे यांनी त्यांना सुनावलं आहे.
दीपक केसरकर २५ दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे तुम्ही विसरु नका. उड्या कशाला मारताय. इज्ज मिळते ती घ्यायला शिका. लायकीपेक्षा जास्त बोलू नका. आपण एका युतीमध्ये आहोत. जेवढी युती टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, तेवढीच तुमच्यावर सुद्धा आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
सोलापुरचं हे शिंदे कुटुंब युट्युबवरून महिन्याला कमवतं लाखो रुपये; एकेकाळी राहत होतं पत्र्याच्या घरात
गुरूपौर्णिमेदिवशीच दिपाली सय्यद एकनाथ शिंदेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा झाली?
देशात आढळला जगातील सर्वांत दुर्मिळ ब्लड ग्रुप; ‘असा’ ब्लड ग्रुप असणारी देशातील ‘ही’ पहिलीच व्यक्ती