Share

विक्रमांचा धुमाकूळ! दीपक हुड्डा, ईशान किशनने केला मोठा विक्रम; रोहित शर्मा, गौतम गंभीरलाही टाकले मागे

२८ जून २०२२ रोजी उशिरा झालेल्या एका रोमांचक सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयर्लंडविरुद्ध ४ धावांनी विजय मिळवला. यासह त्यांनी दोन सामन्यांची टी-२० मालिका २-० अशी जिंकली आहे. डब्लिनच्या द व्हिलेज येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ बाद २२५ धावा केल्या. आयर्लंडचा संघ २० षटकांत ५ गडी गमावून २२१ धावाच करू शकला.(T20, India, Ireland, Deepak Hooda, Gautam Gambhir, Suryakumar Yadav, record)

या सामन्यात दीपक हुड्डा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये शतक झळकावणारा चौथा भारतीय ठरला. एवढेच नाही तर या सामन्यात विक्रमांची धुमश्चक्री पाहायला मिळाली. दीपक हुडाने गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांचे रेकॉर्ड तोडले. त्याचवेळी इशान किशनने रोहित शर्माला मागे टाकले. एवढेच नाही तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही या सामन्याने टॉप-१० मध्ये प्रवेश केला. चला जाणून घेऊया या सामन्यादरम्यान कोणते विक्रम झाले.

दीपक हुड्डा यांनी आतापर्यंत ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र, पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. अशाप्रकारे त्याने आतापर्यंत केवळ ३ सामन्यात फलंदाजी केली आहे. या तीन सामन्यांमध्ये त्याने १७२ धावा (नाबाद २१, नाबाद ४७ आणि १०४ धावा) केल्या आहेत. तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पहिल्या तीन डावात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पोहोचला.

त्याच्या आधी हा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर होता. सूर्यकुमार यादवने पहिल्या तीन डावात १३९ धावा केल्या होत्या. या प्रकरणात सुरेश रैना आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. सुरेश रैनाने पहिल्या ३ टी-२० आंतरराष्ट्रीय डावात १०९ धावा केल्या.

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात कमी डावात ५०० धावा करणारा भारतीय सलामीवीर बनण्याच्या बाबतीत इशान किशन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने १५ व्या डावात ही कामगिरी केली. रोहित शर्माने १५ डावात ५०० टी-२० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. या बाबतीत केएल राहुल अव्वल आहे. राहुलने १३ डावात हे स्थान गाठले होते.

दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रमही केला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात दीपक आणि संजूने दुसऱ्या विकेटसाठी १७६ धावांची भागीदारी केली. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या नावावर होता. दोघांमध्ये १६५ धावांची भागीदारी झाली.

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताची सर्वोच्च धावसंख्या
२६०/५ विरुद्ध श्रीलंका, इंदूर (२०१७)
२४४/४ विरुद्ध वेस्ट इंडीज, फ्लोरिडा (२०१६)
२४०/३ विरुद्ध वेस्ट इंडीज, मुंबई (वानखेडे स्टेडियम) (२०१९)
२२५/७ विरुद्ध आयर्लंड, डब्लिन (२०२२)*
२२४/२ विरुद्ध इंग्लंड, अहमदाबाद (२०२१)

महत्वाच्या बातम्या-
गौतम गंभीरचं धक्कादायक विधान, म्हणाला, केएल राहुलने टी-२० वर्ल्डकपमध्ये
आयपीएलमधील चांगल्या कामगिरीचे या खेळाडूंना मिळाले फळ, टी-२० संघात मिळाली जागा
डोळ्यांवर चष्मा, पांढरी दाढी, ५७ व्या वर्षी टी-२० मध्ये पदार्पण; सचिनच्या आधीपासून खेळतोय वन-डे
हा खेळाडू टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात सर्वात आधी निवडला जाणार, गावसकरांनी केली भविष्यवाणी

 

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now