Share

दीपक चाहरच्या रिसेप्शन पार्टीत ‘हा’ खेळाडू ठरला चर्चेचा विषय, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी, म्हणाले..

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर विवाहबंधनात अडकला आहे. त्याने 1 जून रोजी आग्रा येथे प्रेयसी जया भारद्वाजसोबत सात फेरे घेतले. लग्नानंतर 3 जून रोजी दीपकच्या लग्नासाठी दिल्लीत रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती.

त्या रिसेप्शनमध्ये एका खेळाडूला ओळखण्यात नेटकऱ्यांचा घाम निघाला. दीपक आणि जयाच्या लग्नानंतरच्या रिसेप्शनचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. फोटोंमध्ये टीम इंडियाचे अनेक खेळाडू दिसत आहेत. काही खेळाडू सूट-बूट घातलेले तर काही कॅज्युअल कपड्यांमध्येही दिसले.

या पार्टीत सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा देखील उपस्थित होते. याशिवाय पियुष चावला आणि भुवनेश्वर कुमार यांनीही त्यांच्या कुटुंबीयांसह या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. सोशल मीडियावर या फोटोवर प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत. ट्विटरवरील युजर्सनी जवळपास सर्वच खेळाडूंना ओळखले, पण ऋषभ पंतसोबत हिरव्या कपड्यात उभ्या असलेल्या खेळाडूची बरीच चर्चा झाली.

कुणी लिहिलं की हा पाकिस्तानी खेळाडू हसन अली आहे, कुणी म्हटलं की तो खलील अहमद आहे. अनेक जणांनी तर त्याला हसन अली समजून दीपक चहरला ट्रोल करायला सुरूवात केली होती. पण नंतर तो व्यक्ती नक्की कोण होता? याचा खुलासा झाला आहे.

या पार्टीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यात दीपक चहर (डावीकडून उजवीकडे) अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, दिशांत याज्ञिक, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, करण शर्मा, ईशान किशन, मधुर खत्री हे खेळाडू उभे होते. त्यांच्यानंतर ऋषभ पंत उभा असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. पण त्याच्याच शेजारी जो व्यक्ती उभा आहे तो वास्तविक राजस्थान कडून खेळणारा खेळाडू आहे.

तो दीपक चाहरचा जवळचा मित्र आहे अशी माहिती मिळाली आहे. त्याचे नाव काय आहे हे अदयाप समोर आलेले नाही. जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा नेटकऱ्यांच्या जीवात जीव आला. नाहीतर नेटकऱ्यांनी त्याला हसन अली मानून ट्रोल करण्यास सुरूवात केली होती. चहलने पाकिस्तानी खेळाडूला रिसेप्शनला बोलावलेच कसे काय? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता.

महत्वाच्या बातम्या
मी अनुष्कासोबत पुन्हा सेक्स सीन करु शकतो, कारण ती…; रणवीर सिंगच्या वक्तव्याने उडाली खळबळ
मुसेवालाला माझ्या मुलाने मारले असेल तर त्याचे एन्काऊंटर करा, मला काहीही दुख: होणार नाही; आरोपीच्या आईने स्पष्टच सांगीतले
शिवसेनेचा सुभाष देसाईंना धक्का, विधान परिषदेत सचिन अहीरांसह ‘या’ सामान्य शिवसैनिकालाही संधी
…तर सिद्धू मुसेवाला आज जिवंत असता; प्रत्यक्षदर्शी मित्राने सांगितला हत्येचा संपूर्ण घटनाक्रम

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now