Share

तीन डोळे, तीन शिंगे असणार्‍या नंदीचा मृत्यू; ‘या’ मंदीराच्या आवारातच हिंदू पद्धतीने केले अंत्यसंस्कार

बैल हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे. तर नंदीबैल म्हटल की लगेच महादेवाची आठवण येते. प्रत्येक महादेवाच्या मंदिरात नंदीची मूर्ती असते. त्यामुळे भारतीय संस्कृतीत नंदी बैलाला विषेश महत्व दिलं जातं. याच नंदी बैलाशी संबंधित मध्य प्रदेशमधून एक घटना समोर आली आहे.

मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील बुंदेलखंडमधील केदारनाथ धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या जटाशंकर धाम येथे नंदीबैलाचा मृत्यू झाला आहे. या नंदी बैलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर हिंदू संस्कृतीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

तीन शिंगे आणि तीन डोळे असलेल्या नंदीचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. नंदी बैलच्या शेवटच्या दिवशी मंदिर समितीच्या सदस्यांनी नंदी बैलावर अंतिम संस्कार करण्याचा आणि ब्राह्मणांच्या उपस्थितीत मंत्रपठण करण्याचा निर्णय घेतला.

तब्बल १५ वर्ष नंदीबैल ज्या ठिकाणी बसत होता त्याच ठिकाणी त्या नंदी बैलाने अखेरचा श्वास घेतला आहे. यामुळे मंदिर समितीने ज्या ठिकाणी ते नेहमी बसायचे त्याच ठिकाणी खड्डा खोदून समाधी बनवली. हा नंदी बैल 15 वर्षांपूर्वी जटाशंकर येथे फिरत फिरत आला होता.

त्यादरम्यान तीन डोळे आणि तीन शिंगे असलेल्या या बैलाला पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. त्यामुळेच जटाशंकर धाममध्ये हा बैल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. हा बैल इथे आला, तेव्हापासून जटाशंकर धामला येणारे सर्व भाविक लोकांनी त्याचे नाव नंदी ठेवले.

लोक नंदी बैलाच्या कानात त्यांची इच्छा विचारायचे. पण आता नंदीच्या मृत्यूनंतर महिलांनी नंदीच्या मृतदेहाजवळ बसून भजन कीर्तन केले. दुसरीकडे, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, नंदीची समाधी ज्या ठिकाणी देण्यात आली आहे, ती जागा समिती स्मारक म्हणून विकसित करणार आहे. जटाशंकर धाम बुंदेलखंड प्रदेशातील बिजावर तहसीलपासून १५ किमी अंतरावर आहे.

येथे चारही बाजूंनी सुंदर पर्वतांनी वेढलेले एक शिवमंदिर आहे आणि येथे विराजमान असलेल्या भगवान शिवाला नेहमी गायमुखातून पडणाऱ्या प्रवाहाने अभिषेक केला जातो. या मंदिरावर तीन लहान पाण्याच्या टाक्या आहेत. ज्यांचे पाणी कधीच संपत नाही. मात्र, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या कुंडांतील पाण्याचे तापमान नेहमीच हवामानाच्या विरुद्ध असते. असे मानले जाते की येथील पाण्याने आंघोळ केल्याने अनेक रोग दूर होतात.

महत्वाच्या बातम्या – 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now