सोमवारी गाझियाबादमध्ये संशयास्पदरित्या बेपत्ता झालेल्या रिया जैनच्या खळबळजनक हत्येत तिच्या सासू सासऱ्यांसह तिचा नवराही सामिल होता असा खुलासा झाला. या घटनेचा खुलासा करत विजयनगर पोलिसांनी तिघांनाही अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाने काही दिवसांपूर्वी नवऱ्याला कानाखाली मारली होती त्यामुळे सासूने एक योजना आखली आणि मुलासोबत मिळून मुरादनगर भागात रियाचा गळा चिरून तिचे डोके गंगानगरमध्ये फेकले. (daughter in law killed by his husband)
पोलिसांनी हत्येत वापरलेले हत्यार जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील उज्जैन येथील रहिवासी असलेल्या रिया जैन (२६) हिने मार्च २०२१ मध्ये सिहानी रोड येथील विद्या विहार येथे राहणारा आकाश त्यागी याच्याशी लग्न केले होते. दोघांनी सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे शिक्षण एकत्र घेतले होते. 2015 पासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले.
लग्नानंतर रिया विजयनगर पोलिस स्टेशन हद्दीतील क्रॉसिंग रिपब्लिकमधील प्रीत ग्रँड सोसायटीमध्ये पती आणि सासूसोबत राहत होती. रिया आणि तिचा नवरा सध्या वेगवेगळ्या कंपनीत काम करत होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याचे कुटुंबीय आकाशच्या लग्नावर खुश नव्हते. हुंड्यासाठी तो रियाचा छळ करत असे. त्यामुळे त्याचे रोज रियाशी भांडण होत असे.
पुढे पोलिसांनी सांगितले की, एके दिवशी भांडणाच्या वेळी रियाने त्याला कानाखाली मारली, त्यानंतर त्याने पत्नीला ठार मारण्याचा प्लॅन आखण्याचे ठरवले. सोमवारी रियाच्या पोटात दुखत होते. या योजनेंतर्गत पती आकाशने ऑटो बुक केला आणि सासू उषा त्यागी तिला घेऊन संजयनगर येथील अल्ट्रासाऊंड सेंटरमध्ये गेली. अल्ट्रासाऊंड सेंटर दोन वाजता बंद होते, म्हणून सासू तिला घेऊन तीन वाजता तेथे पोहोचली. तेथे सासरे सुरेश त्यागी स्कूटी घेऊन उभे असल्याचे दिसले.
फिरण्याच्या बहाण्याने त्याने रियाला स्कूटीवर बसवले. संजयनगरहून मुरादनगरच्या दिशेने जात असताना वाटेत सासूने शीतपेय आणले आणि त्यात नशेचा पदार्थ मिसळून ते रियाला दिले. शहजादपूर गावाजवळ रिया बेशुद्ध पडल्यावर सासूने तिला उसाच्या शेतात नेऊन तिचा शिरच्छेद केला आणि परत येत असताना तिचे डोके गंगानगरमध्ये फेकले.
हत्येनंतर जेव्हा रियाची सासू घरी परतली तेव्हा पती आकाशने डायल-112 वर कॉल केला आणि काही लोकांनी रियाचे अपहरण केल्याची माहिती दिली. त्याने सांगितले की रिया तिच्या सासूसोबत बाजारात जात होती. त्याचवेळी कारमध्ये काही लोक आले आणि त्यांनी तिचे अपहरण केले. चौकशीत आकाशने पोलिसांना सांगितले की, रियाचा भाऊ राहुल लोकांकडून पैसे घेऊन मध्य प्रदेशात पळून गेला होता.
सावकारांनी रियाचे अपहरण केले आहे. प्रकरणाचा उलगडा होत नसताना पोलिसांनी कडक चौकशी केली असता, बुधवारी सासरच्या मंडळींना रियाचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला. सासरे सुरेश यांनी पोलिसांना सांगितले की, रिया आणि तिचा भाऊ राहुलला जीवे मारण्याची धमकी देत असे. ती तिच्या भावाला आणि काकांना मध्य प्रदेशचे मोठे गुंड असल्याचे सांगायची.
याशिवाय तिचे रोज घरात भांडण व्हायचे. रियापासून त्याला आपल्या मुलाला वेगळे करायचे होते त्यामुळे त्याने रियाची हत्या केली. रियाचे डोके बाहेर काढण्यासाठी गंगानगरमध्ये तपास चालू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेने पुर्ण परिसरात खळबळ माजली आहे. सासरच्यांनी सुनेचा इतक्या भयानक प्रकारे खुन केल्याने सगळीकडे त्यांची दहशत पसरली आहे.
महत्वाच्या बातम्या
भारताची चिंता वाढली, चीनने बनवला बर्फावर धावणारा रोबोट, करतो आश्चर्यकारक कारनामे
‘माझ्या ब्रा चं माप देव घेतोय’ म्हणणाऱ्या श्वेता तिवारीविरोधात गुन्हा दाखल, थेट गृहमंत्र्यांनी घेतली दखल
जंगलात नेऊन शाळेतील विद्यार्थीनीवर केला सामूहिक बलात्कार, घराबाहेर सोडून गेले पळून
मोठी बातमी : भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका