Share

राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दानवे सुद्धा भडकले; म्हणाले, अशी वक्तव्ये करणे महाराष्ट्राचा अपमान

bhagat

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. अनेकदा बोलताना ते काही अशी वक्तव्ये करुन जातात ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडतात. आता असेच एक वक्तव्य त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. (danave angry on bhagatsingh koshyari)

भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर उडी घेत मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच मोदी है तो मुमकीन है असे म्हटले आहे. तसेच मोदींच्या नेतृत्वातच पाणी प्रश्न निकाली लागेन, असे भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे.

आता राज्यपालांच्या या टीकेवर शिवसेनेनेही उत्तर दिले आहे. राज्यपालांनी औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावर बोलणे म्हणजे अजाणतेपणाचे लक्षण आहे, अशा शब्दांत शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी राज्यपालांना सुनावले आहे. तसेच राज्यपालांचे हे राजकारण आहे, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद पाणी प्रश्नावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय हे तीन आयएएस दर्जाचे अधिकारी तिथे काम करत आहे. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

तसेच अधिकाऱ्यांच्या कामावर नागरीकही हळूहळू समाधानी होत आहे. औरंगाबाद प्रमाणेच सोलापूर आणि धुळे येथील पाणी प्रश्न आहे. परंतू तिथे भाजपचे महापौर आहे. त्यामुळे राज्यपालांनी मुद्दामून औरंगाबादवर बोलणे हे राजकारण आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी आणि शिवसेना यांच्याविरोधात राज्यपाल सातत्याने बोलत असतात. राज्यपाल ज्याप्रमाणे पाणी प्रश्नावर बोलले त्याचप्रमाणे त्यांनी महागाई, पेट्रोल, गॅस दरवाढ आणि बेरोजगारीवरही भाष्य केले आहे. कोणतीही माहिती न घेता अशी वक्तव्य करणे महाराष्ट्राचा अपमान आहे, असा टोलाही अंबादान दानवे यांनी राज्यपालांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-
तिकिटासाठी पैसे नाहीत, म्हणून तरुणाने एसटीच्या पाठीमागे लटकून केला प्रवास; पाहा फोटो
नवऱ्यासाठी निर्जळी उपवास अन् वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा…; अभिनेत्रीने महीलांना दिला ‘हा’ सल्ला
राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्याने केलं ‘हे’ हैराण करणारं काम, बाळा नांदगावकरांनीही केलं कौतूक

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now