नाशिकच्या आव्हाडांचं गुरुपौर्णिमेनिमित्त खास गिफ्ट, १२ कर्मचाऱ्यांना दिली नवी कोरी महिंद्राची कार

बुधवारी गुरुपौर्णिमा होती. अनेकांनी आपल्या गुरुंचे आशीर्वाद घेतले तर अनेकांनी आपल्या गुरुंना वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. तर काहींनी आपल्या गुरुंना विशेष भेट सुद्धा दिल्या. पण अशात नाशिकच्या एका कंपनीने खुप अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली आहे. (dairy power ceo gift car to their employee)

नाशिकमधील डेअरी पॉवर या कंपनीने गुरु म्हणत आपल्या कर्मचाऱ्यांनाच खास गिफ्ट दिले आहे. त्यांनी एकाचवेळी आपल्या १२ कर्मचाऱ्यांना महिंद्रा एक्सयुव्ही ३०० ही कार भेट दिली आहे. त्यामुळे फक्त नाशिकमध्येच नाही, तर राज्यभरात या कंपनीची चर्चा होत आहे.

डेअरी पॉवर ही कंपनी दूध आणि दूग्धजन्य उत्पादने तयार करणाऱ्याचे काम करते. या कंपनीने आपल्या १२ कर्मचाऱ्यांना महिंद्राची कार गिफ्ट केली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे यंदाची गुरुपौर्णिमा ही कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खुप आनंदाची ठरली आहे.

कंपनीचे सर्व कर्मचारीच आपले गुरु आहे, अशी भावना कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी १२ कर्मचाऱ्यांना महिंद्राची एक्सयुव्ही कार भेट देत त्यांना एक सुखद धक्का दिला आहे.

माझा प्रत्येक कर्मचारी हा माझ्या घरातील सदस्यच आहे. त्यामुळे माझ्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाकडे घर, पैसा आणि गाडी असणं गरजेचं आहे. सध्या गाडी असणं ही काळाची गरज आहे. ही संधी मला कुणी दिली नाही, म्हणून ती संधी मी माझ्या कर्मचाऱ्यांना दिली, असे दीपक आव्हाड यांनी म्हटले आहे.

तसेच एक दीपक आव्हाड उभा राहिला तर ७५० लोक उभे राहतात. तर असे जवळपास मला १०० दीपक आव्हाड उभे करायचे आहे. तरच नाशिकसाठी आपण काहीतरी परिवर्तन घडवू शकू. नाशिकला मोठं करण्याचा माझा प्रयत्न आहे. नाशिकचा पैसा नाशिकमध्येच कसा राहिल यासाठीही मी प्रयत्न करत असतो, असेही दीपक आव्हाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महिंद्रा एक्सयुव्हीची किंमत १२ लाख ६० हजार रुपये आहे. एवढी किंमत असूनही त्यांनी तब्बल १२ कर्मचाऱ्यांना ही कार दिली आहे. त्यांनी नाशिकमध्ये निर्मिती होणाऱ्या कारचीच निवड केली आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला इतकी मोठी भेट भेटल्यामुळे कर्मचारी सुद्धा आनंदी आहे.

महत्वाच्या बातम्या-
सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या रोमँटिक फोटोवर रणवीर सिंगने दिली हटके प्रतिक्रिया, म्हणाला…
आपल्याच आईच्या मैत्रिणीशी ललित मोदींनी केले होते लग्न, लव्हस्टोरी वाचून सुष्मिताला जाल विसरुन
गावात दोन हेलिपॅड पण शाळा, रस्ते, रूग्णालय नाही; उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना झापले, म्हणाले…