Share

आपल्या समर्थकांचा दादा भुसेंनी उघडला व्हॉट्सग्रुप, समर्थकांनी त्यांनाच घातल्या शिव्या

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. सध्या सर्व आमदार आसामच्या गुवाहटीमध्ये आहेत. (dada bhuse supporter angry on dada bhuse)

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याभरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहे. कृषीमंत्री दादा भुसे हेही एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही टीका होऊ लागली आहे. अशात त्यांच्याच समर्थकांनी त्यांची चिरफाड केली आहे.

दादा भुसे यांनी व्हॉट्सऍप ग्रुप तयार केला होता. त्यांच्याच ग्रुपवर त्यांच्याच समर्थकांनी दादा भुसेंवर टीका केली आहे. आमदार घेऊन गेलेत, मतदार अजूनही शिवसेनेतच आहेत, हे विसरु नका, असा टोला खुद्द बंडखोर आमदाराच्या समर्थकांनी लगावला आहे.

एक समर्थक म्हणाला की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आम्हाला वेळ दिला नाही ही तक्रार आहे. पण या आमदारांनी तरी कुठे निवडून आल्यावर जनतेला वेळ दिला? तसेच त्याच्यावर गुलाबराव पाटलांचाही व्हिडिओ पाठवण्यात आला. त्यात ते मतलब के लिए लोग बाप बदलते है, असे ते म्हणताना दिसून येत आहे.

तसेच बाळासाहेबांची शिवसेना संपली, ही उद्धवजींची सेना आहे, असं म्हणणाऱ्यांनो ठाकरे आणि शिवसेना हे वेगळं करुन तुम्ही चालवून दाखवा. बाळासाहेबांचा फोटो न लावता तुम्ही ते चालवून दाखवा, असा टोमणा काही समर्थकांनी मारला आहे. अनेकांनी तर दादा भुसे यांना शिव्याही घातल्या आहे.

तसेच प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, संजय शिरसाट, भरत गोगावले, यामिनी जाधव यांनाही लोकांनी ट्रोल केले आहे. एकाने तर म्हटले की, आमदार अब्दुल सत्तार हे शिवसेनेत येण्याआधी हिंदुंबाबत अपशब्द वापरत होते. आज ते एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे, हाच एक मोठा विनोद आहे.

महत्वाच्या बातम्या-
“आम्ही कोणत्याही पक्षाकडून निवडूण येऊ शकतो; फक्त शिवसेनेच्या नावावर मते मिळत नाहीत”
“मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच, मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही”
आमदारांची सुरक्षा काढली नाही, शिंदे खोटे आरोप करताहेत; गृहमंत्र्यांनी केली शिंदेंची पोलखोल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now