cyrus mistry and anahita pandol | प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी संचालक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले होते. ४ सप्टेंबरला सायरस मिस्त्री हे मुंबई-अहमदाबाद मार्गावरुन जात होते. त्यावेळी त्यांच्या कारला अपघात झाला, त्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत अनाहिता पंडोल यासुद्धा होत्या.
या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. पण या कार अपघाताच्या चौकशीत काही धक्कादायक माहिती समोर आली होती. पंडोल या कार खुप वेगाने चालवत होत्या, त्यामुळे कारचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अनाहिता पंडोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशात अनहिता पंडोल यांच्याबाबत पोलिसांनी आता आणखी एक दावा केला आहे. गाडी चालवताना अनाहिता पंडोल यांनी सीटबेल्ट चुकीच्या पद्धतीने लावला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पालघरचे पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मिस्त्री आणि पंडोल यांचा अपघात पालघरमधील सूर्या नदीजवळ झाला होता. या अपघातात सायरस मिस्त्री यांचे निधन झाले. या अपघातात अनाहिता आणि त्यांचे पती डेरियस हे देखील गंभीर जखमी झाले होते. ते तिघेही मुंबईकडे परतत असताना हा अपघात झाला आहे. त्यावेळा अनाहिता याच कार चालवत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार अनाहिता यांनी चुकीच्या पद्धतीने बेल्ट लावला होता. मर्सिडिज बेंज किंवा कोणत्याही इलेक्ट्रिक एक अलार्म सेट केलेला असतो. जर सीट बेल्ट योग्य पद्धतीने नाही लावला तर तो अलार्म वाजतो. तो अलार्म वाजू नये म्हणून अनाहिता यांनी लॅप बेल्टचा वापर केला होता. त्यांनी फक्त शोल्डर हार्नेस लावला होता.
अनाहिता याचा हा निष्काळजीपणा आरोपपत्रात नमूद करण्यात येणार आहे. अनाहिता यांना रुग्णालयात डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेचच त्यांचा जबाब नोंदवणार आहे. त्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. अनाहिता यांच्यावर मुंबईच्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून धोका; राज्यातील बड्या उघड केला आतला प्लॅन
prakash ambedkar : …तर ‘या’ प्रकरणामुळे शिवसेनेवरही शिंतोडे उडतील; प्रकाश आंबेडकरांनी सांगीतला मोठा धोका
mukesh khanna : आज अर्ध्या कपड्यांवर नाचताय, उद्या कपडे न घालताच…; दीपिकाच्या बिकीनीवर शक्तीमान भडकला