Share

ना ओटीपी आला, ना मेसेज, तरी पोलिस कर्मचाऱ्याच्या खात्यातून गायब झाले ३१ लाख, वाचा काय घडलं…

गेल्या काही महिन्यांपासून सायबर क्राईमचे गुन्हे वाढताना दिसून येत आहे. सायबर क्राईम करणारा व्यक्ती मेसेज, फोन करुन ओटीपी जाणून लोकांचे खाते रिकामे करत असल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील, पण सध्या एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. (cyber crime happen with police officer)

नोएडातील एका पोलिसाच्या खात्यातून ३१ लाख रुपयांची रक्कम गायब झाली आहे. ना ओटीपी आला, ना एसएमएस तरी बँक खात्यातून ३१ लाख रुपये गायब झाले आहे. याप्रकरणी नोएडा सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र शर्मा असे तक्रार दाखल करणाऱ्या माजी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

३१ मार्च २०२० रोजी रवींद्र शर्मा हे पोलिस दलातून निवृत्त झाले होते निवृत्तीच्या वेळी त्यांच्या खात्यात ३१ लाख १० हजार ४९० रुपये होते. त्यांचे खाते उत्तर प्रदेश येथील बागपतमधल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होते. खात्यात जमा असलेली रक्कम त्यांनी नवीन घर बांधण्यासाठी ठेवली होती, असे त्यांनी सांगितले आहे.

रोकड घरात ठेवली तर चोरांची भिती होती, त्यामुळे त्यांनी ती रक्कम बँकेत जमा केलेली होती. पण बँकेतही त्यांचे पैसे सुरक्षित नाहीये हे त्यांना माहित नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार बँकेतून जेव्हा त्यांचे पैसे गायब झाले, तेव्हा त्यांना कोणताही ओटीपी आला नाही.

सायबर गुन्हेगाराने शर्मा यांना फोन केला होता. त्याने आपण कोषागार कार्यालयात कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्याला सर्व माहिती सांगितली. रवींद्र शर्मा यांनी जॉईनिंग डेटपासून रिटायरमेंटपर्यंत सर्व माहिती त्याला दिली. यानंतर खात्यात जमा असलेल्या पैशांची माहितीही त्यांनी त्याला दिली.

त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशनच्या नावाखाली बँक तपशील आणि एटीएम कार्डची माहिती घेतली. याआधारे सायबर गुन्हेगारांनी तब्बल ३१ लाख रुपये रवींद्र शर्मांच्या खात्यातून काढून घेतले. पोलिस या प्रकरणी तपास करत असून शर्मांचे पैसे ५० पेक्षा जास्त शहरातील १०० खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले आहे. पण अजून गुन्हेगारांना शोधण्यास पोलिसांना यश मिळालेले नाही.

महत्वाच्या बातम्या-
तो पक्का हनुमान भक्त होता, रात्री दोनला उठायचा अन्..; अधिकाऱ्याने सांगितला संजूबाबाचा येरवड्यातला किस्सा
राज्यसभा निवडणूक! विनोद तावडे यांचा पुन्हा एकदा पत्ता कट; भाजपने ‘या’ चेहऱ्यांना दिली संधी
मोदी सरकार समान नागरी कायदा आणण्यावर ठाम, आता घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now