सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अशात वेगवेगळ्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून शेतीचा बांध कोरला तर ५ वर्षांची शिक्षा होणार अशी बातमी व्हायरल होत आहे. तसेच मेसेजमध्ये कायद्यामध्येही याची तरतुद केली गेलेली आहे, असे म्हटले आहे. (cutting dams in the field punishment)
शेतीची मशागत करताना आजकाल सर्वत्र ट्रॅक्टरचा वापर केला जातो. ट्रॅक्टरने मशागत करताना नजरचुकीने किंवा जाणीवपूर्वक बांध कोरला जातो. यामुळे अनेकदा दोन शेतकऱ्यांमध्ये वाद होतात. अशावेळी ट्रॅक्टर चालक आणि शेतजमिनीचा मालक यांच्या दोन्हींवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
गुन्हेगारांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ट्रॅक्टर जप्त अशी शिक्षा दिली जाऊ शकते. कायद्यात या प्रकारची तरतुद केली गेली आहे. अशाप्रकारचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण यामध्ये किती तथ्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
याबाबत महसूल तज्ञ प्रल्हाद कचरे सांगतात की, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांमध्ये शेतीच्या बांधासंबंधीचे वाद मिटवण्याची व्यवस्था आहे. पण बांध कोरल्यास ५ वर्षे कारावास होईल अशा प्रकारची कोणतीही शिक्षा नमूद केलेली नाहीये.
तसेच जमिनीचे बांध सांभाळणे ही त्या जमिनीच्या मालकाची जबाबदारी आहे. तरीही कोणत्या व्यक्तीने त्याचे बांध कोरल्यास त्याची तक्रार तो जिल्हाधिकारी यांच्याकडे करु शकतो. त्यानंतर जिल्हाधिकारी त्याची चौकशी करु शकतात आणि दोन्हीकडची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यावर निर्णय घेऊ शकतात, असेही प्रल्हाद कचरे यांनी म्हटले आहे.
सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये राज्यात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ हा कायदा अस्तित्वात आहे. याविषयी बोलताना महसूल कायदेतज्ञ डॉ. संजय कुटे सांगतात की, महसूल कायद्यामध्ये सीमा आणि चिन्हे असा विषय आहे. त्यामध्ये बांध व्यवस्थित ठेवणे आणि न ठेवणे याचा उल्लेख करण्यात आला आहे.
बांधाच्या निशाणीचे नुकसान करणे किंवा बांध काढून टाकणे असे कृत्य केल्यास संबंधित व्यक्तीला १०० रुपये इतका दंड होऊ शकतो, अशी कायद्यातील तरतूद आहे, अशी माहिती संजय कुटे यांनी दिली आहे. त्यामुळे व्हायरल होत असलेला मेसेज खोटा असल्याचे लक्षात येते.
महत्वाच्या बातम्या-
मी अनुष्कासोबत पुन्हा सेक्स सीन करु शकतो, कारण ती…; रणवीर सिंगच्या वक्तव्याने उडाली खळबळ
मुसेवालाला माझ्या मुलाने मारले असेल तर त्याचे एन्काऊंटर करा, मला काहीही दुख: होणार नाही; आरोपीच्या आईने स्पष्टच सांगीतले
शिवसेनेचा पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिकावर विश्वास, विधानपरिषदेसाठी संधी दिलेले पाडवी आहेत तरी कोण? जाणून घ्या..