अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टपेक्षा ‘या’ वेबसाईटवर स्वस्तात मिळतोय iPhone13; २४ हजारांपर्यंत भरघोस सूट, लगेच करा खरेदी

आजकाल आयफोन्सची मागणी खूप वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स वेबसाइट आयफोन १३ सिरिजसह अनेक आयफोन मॉडेल्सवर प्रचंड सूट देत आहेत. पण, आता क्रोमा आयफोन १३ वर सर्वात जास्त सूट देत आहे. (croma discount on iphone 13)

क्रोमा आयसीआयसीआय, कोटक आणि एसबीआय सोबत भागीदारी करून हा फोन ६ हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटवर विकत आहे. याव्यतिरिक्त, जर तुमच्याकडे जुना फोन असेल आणि तुम्हाला तो एक्सचेंज करायचा असेल तर, आयफोन १३ ची किंमत आणखी कमी होईल. हे तुमच्या फोनच्या स्थितीवर अवलंबून आहे,की जुन्या फोनच्या देवाणघेवाणीवर तुम्हाला किती सूट मिळेल.

क्रोमा १२८ GB स्टोरेज असलेल्या आयफोन १३ ला ७३,९९० रुपयांच्या किंमतीला विकत आहे. तर २५६ GB आणि ५१२ GB स्टोरेज मॉडेल्स अनुक्रमे ८४,९९० आणि १,०३,९९० च्या किमतींसह आहेत. तसेच ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्मने आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि एसबीआयच्या कार्डवरुन पेमेंट करणार असाल तर तुम्हाला ६ हजारांची सूट देण्यात येईल.

या ऑफरसाठी कोणतेही नियम आणि अटी नाहीत. पण जेव्हा तुम्ही आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरून ही खरेदी करता तेव्हाच ही ऑफर लागू होते. बँक सवलत लागू केल्यानंतर, तुम्हाला आयफोन १३ १२८ GB स्टोरेज मॉडेल ६७,९९० रुपयांमध्ये मिळू शकेल. तर २५६ GB आणि ५१२ GB स्टोरेज मॉडेल्स अनुक्रमे ७८,९९० आणि ९७,९९० रुपयांना उपलब्ध असतील.

तसेच तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना आयफोन असल्यास, आयफोन १३ ची अंतिम किंमत आणखी कमी होईल. क्रोमा एक वर्ष जुन्या आयफोन १२ १२८ GB स्टोरेज मॉडेलवर सुमारे २४,५०० रुपये ऑफर करत आहे, ज्यामुळे आयफोनची किंमत सुमारे ४३,५०० रुपयांपर्यंत कमी होते.

त्यामुळे जर तुम्ही आयफोन १३ खरेदी करण्याचा खूप दिवसांपासून विचार करत असाल, तर आयफोन १३ ची किंमत पुन्हा वाढण्यापूर्वी तुम्ही या ऑफरवरुन नक्कीच फोन खरेदी करु शकतात, तेही कमी किंमतीत. ही ऑफर मर्यादीत कालावधीपर्यंतच आहे, त्यामुळे जर तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही ऑफर संपण्याआधीच फोन खरेदी करणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या-
विकी-कतरिना सीक्रेट लोकेशनवर करत आहेत एन्जॉय, रोमॅंटिक फोटो झाले व्हायरल, चाहते म्हणाले..
‘या’ चित्रपटात आमिरसोबत झळकणार जेनेलिया देशमुख, अनेक वर्षांनंतर चालणार क्युटनेसचा जादू
मुलीच्या जीवापेक्षा अब्रू ठरली महत्त्वाची; बलात्कार झाला म्हणून बापाने लेकीचा घोटला गळा, थरकाप उडवणारी घटना