Share

“देवेंद्र फडणवीस नटसम्राट असून ते स्टोरी बनवण्यात एक्स्पर्ट आहेत”

महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार भाजपच्या नेत्यांना खोट्या कारस्थानात अडकवण्यासाठी कसे षडयंत्र रचते याचा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी पेनड्राईव्हाच्या माध्यमातून याबाबतचे सर्व पुरावे उपाध्यक्षांकडे जमा केले आहेत.

सुमारे 125 तासांच्या स्टिंग ऑपरेशनमधील महत्त्वाचे भाग फडवीसांनी 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून सादर केले आहेत. यामध्ये आघाडीने भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटे जाळे रचून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न कसा केला. याप्रकरणात कोण नेते सहभागी होते. तसेच ड्रग्स प्रकरणात आघाडीने आरोपींचा कसा बचाव केला. याविषयीचे सर्व पुरावे फडणवीस यांनी उपाध्यक्षांकडे जमा केले आहेत.

त्यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. “फडणवीसांनी दिलेल्या व्हिडिओची सत्यता तपासून कळेल. ते नटसम्राट आहेत स्टोरी कशी बनवायची ह्यात ते एक्स्पर्ट आहेत. जसे फोन टॅपिंग केले, पोलीस वापर केला, सत्तेचा दुरुपयोग करण्याची सुरुवात भाजपपासून झाली.” अशा शब्दात नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाना साधला आहे.

भाजपनेच सत्तेचा दुरुपयोग केला आहे. फोन टॅपींग प्रकरण केले गेले. रश्मी शुक्ला प्रकरणात काय झाले ते माहित आहे. त्यामुळे भाजपने कांगाव करणे थांबवावे. मात्र, इक्बाल मिरचीच्या आरोपावरुन भाजपवरही कारवाई का केली जाऊ नये? रश्मी शुक्ला प्रकरणात काय झाले ते माहित आहे. असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, पुरावे सादर करताना देवेंद्र फडवीसांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. भाजप नेत्यांच्या विरोधात कट रचताना शरद पवार सुध्दा सहभागी असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. यावेळी बोलत असताना, गिरीश महाजनांवर मोक्का लागावा यासाठी राज्य सरकारने सरकारी वकिलांना हाताशी धरुन खटाटोप केला.

त्यात पोलिसांचाही सहभाग आहे. हे सर्व कुंभांड रचण्यात आले. एफआयआर सरकारी वकिलाने लिहिला. जबान्या त्यांनी पाठ केल्या. हे सर्व सरकारी वकील स्वःत तोंडाने सांगत असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या
LIC ची ‘ही’ योजना देतेय जबरदस्त परतावा; फक्त १७२ रुपये भरा आणि २८ लाख मिळवा
‘झुंड’ने बॉक्स ऑफिसवर कमाईची अपेक्षा पुर्ण केली का? नागराज मंजुळेंच्या उत्तराने जिंकली लोकांची मनं
भरधाव बसची मागून धडक, कॉलेज विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, पहा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ
मतांची चोरी! ईव्हीएम मशीन चोरणाऱ्या गाड्या वाराणसीमध्ये पकडल्या; दोन गाड्या मात्र फरार

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now