IPL मध्ये मिळाले २.८० कोटी, तरी अंगावर घालायला कपडे नाही; खेळाडूने स्वत:च सांगितली आपबिती

आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केल्यामुळे अनेक तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळत असते. त्यामुळे खेळाडू आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करतात. यंदाच्या सिजनमध्येही अनेक खेळाडू त्यांच्या कामगिरीमुळे चर्चेत आले आहे.(cricketer rovman powell success story)

आयपीएलमध्ये असेही खेळाडू आहेत, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खुप संघर्ष केला आहे. काहींनी तर अत्यंत हालाकीचे दिवसही पाहिले आहेत. पण आता ते त्यांच्या कौशल्यावर पुढे जात असून आयपीएलमध्ये कोटींनी पैसा कमवत आहे. त्यातलाच एक खेळाडू म्हणजे रोव्हमन पॉवेल.

दिल्ली कॅपिटल्सचा स्फोटक फलंदाज रोव्हमन पॉवेलने त्याच्या फ्रँचायझीच्या पॉडकास्ट शोमध्ये आयुष्यात केलेल्या संघर्षावर भाष्य केले आहे. तसेच त्याने त्याच्या गरीबीबद्दलही सांगितले आहे., मुंबईत जेव्हा तो आला होता, तेव्हाचा त्याने एक किस्साही सांगितला आहे.

पॉवेलने सांगितले की, ‘मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मला सांगण्यात आले की एअरलाइन्सकडे माझी एकही बॅग नाही. माझ्याकडे फक्त माझी हँडबॅग होती. माझ्याकडे कोणतेही अतिरिक्त कपडे नव्हते. अशा परिस्थितीत मला माझ्या हॉटेलच्या खोलीत टॉवेल गुंडाळून २ ते ३ दिवस काढावे लागले, तसेच खोलीचा दरवाजा कोणी ठोठावला तर मी दाराच्या मागूनच त्याच्यांशी बोलायचो.

रोव्हमन पॉवेल हा अत्यंत गरीब कुटुंबातून आला आहे. ते एका टीन शेडमधील घरात राहत होते, जिथे पावसाळ्यात छतावरून पाणी गळायचे. अशातच ते रात्र काढायचे. अनेक वेळा घरात खायला काहीच नसायचे. त्याच्या आईने त्याला कष्टाने शिकवले आहे आणि इथपर्यंत त्याची साथ दिली आहे.

आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देताना पॉवेल म्हणतो, ‘मी एका छोट्या गावातून आलो आहे, जिथे बहुतांश कुटुंबांसाठी शेती हाच मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे. क्रिकेट आणि शिक्षणाच्या माध्यमातून माझ्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते.

तसेच आतापर्यंत क्रिकेटने मला चांगली साथ दिली आहे. मी क्रिकेटर झालो नसतो तर सैनिक झालो असतो. व्यावसायिक क्रिकेटपटू होण्यापूर्वी मी सैनिक बनणार होतो, पण माझ्या नशिबाने मला इथे आणले, असेही रोव्हमन पॉवेलने म्हटले आहे. १६१ च्या स्फोटक स्ट्राइक रेटने त्याने यंदाच्या सिजनमध्ये संघाकडून २०५ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याला २.८० कोटीत खरेदी करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-
राज्यसभा खासदारकीची निवडणूकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी मला पाठींबा द्यावा; संभाजीराजेंची मागणी
छत्रपती संभाजीराजेंचा सवता सुभा, “स्वराज्य” संघटनेची स्थापणा; निवडणूकही लढणार..
बॉलिवूडला टोमणा मारल्यानंतर महेश बाबूने घेतला सपशेल युटर्न, म्हणाला, बॉलिवूडवर केलेले वक्तव्य…