बॉलिवूडमध्ये मागील काही दिवसांपासून लगीनघाई सुरू झाली आहे. मागील महिन्यातच अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांनी गुपचूप लग्न केले. आता या कलाकारांच्या नंतर अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा नंबर लागण्याची शक्यता आहे. याच यादीत आता आणखी दोन कलाकारांची नावे जोडली आहे.
दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. हे कलाकार म्हणजे अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि भारतीय फलंदाज के एल राहुल होय. हे दोघे मागील ३ वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्याचबरोबर अथियाचा भाऊ अहान शेट्टी हा देखील याच वर्षात लग्न करण्याची शक्यता आहे.
अहान देखील फॅशन डीझायनर तानिया श्रॉफला डेट करत आहे. त्याचबरोबर अथिया आणि के एल राहुलच्या लग्नाला दोन्ही कुटुंबाकडून परवानगी मिळालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेट्टी कुटुंबियांच्या जवळील एका मित्राने सांगितले आहे की, २०२२ मध्ये अथिया आणि भाऊ अहान यांचे लग्न होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर अहान आणि तानिया हे दोघेही सध्या सिरियस रेलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचे ही लवकरच लग्न होण्याची शक्यता आहे. या बातमीवर अभिनेता सुनील शेट्टीने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता सुनील शेट्टीच्या मते, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. मुलगा अहान आणि अथिया यांचे या वर्षात लग्न होणार नाही. सुनील शेट्टीने आपली ही प्रतिक्रिया ट्विटरवर ट्विट करत दिलेली आहे.
आता अथिया आणि के एल राहुलच्या लग्नाची चाहत्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. अथियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘हिरो’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ‘मुबारक’, ‘नवाबजादे’, ‘मोतीचुर चकणाचुर’ हे चित्रपट केले. मात्र तिला चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करता आले नाही.
त्याचबरोबर के एल राहुल बद्दल बोलायचे झाले तर, तो देखील सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. सध्या तो दक्षिण आफ्रिका विरुद्ध एकदिवसीय सामने खेळत आहे. इतकेच नव्हे तर, तो सध्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. आतापर्यंत २ एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र दोन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ हा भारतीय संघाच्या वरचढ ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या
निसान लॉन्च करणार आपली पहिली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, टाटा आणि ह्युंदाईला देणार टक्कर
पिंपरीतील खळबळजनक प्रकार! ‘भाई’ नाही म्हणाला म्हणून खायला लावली जमिनीवरची बिस्कीटे
PHOTO: लेहंगा-चोलीमध्ये फोटो शेअर करत शहनाज म्हणाली, दिवस कसा आहे? चाहते म्हणाले..
जेव्हा दाऊदचे गुंड आनंद दिघेंच्या मागे लागले होते, तेव्हा…; वाचा सर्वात जवळच्या व्यक्तीने सांगीतलेला ‘तो’ थरारक किस्सा






