शेअर बाजारात एखादा पेनी स्टॉक कधी झेप घेईल हे सांगता येत नाही. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे जरा जोखमीचे असते. परंतु प्रत्येकवेळी गुंतवणूकदारांचे नुकसान होईलच असे नाही. काही असेही पेनी स्टॉक आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदार मालामाल होऊन जातो. जाणुन घेऊया अशाच एका पेनी स्टॉकबद्दल.
एकेकाळी राज रेयॉन इंडस्ट्रीजचा केवळ २५ पैसे किमतीचा शेअर्स आज ९ रूपये २५ पैशांवर पोहोचला आहे. केवळ वर्षभरातच या शेअर्सने तब्बल ३६४० टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. शेअर्समध्ये मागील तीन महिन्यात कमालीची घसरण झाल्याने या इंडस्ट्रीजच्या प्रमोटर्सनी त्यांचे सगळे शेअर विकून टाकले. आता या प्रमोटर्सची हिस्सेदारी अगदी शून्य आहे.
या इंडस्ट्रीजच्या शेअर्सचे डिसेंबर तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे खुप कमी होते. मागील सात तिमाहीत या कंपनीला खुप मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळेच या कंपनीच्या प्रमोटर्सनी मार्च २०२२ चा तिमाहीत सगळे शेअर विकले. ही कंपनी पॉलिस्टर चिप्स, पॉलिस्टर धागा आणि प्रक्रिया केलेले धागे तयार करते.
राज रेयॉन इंडस्ट्रीज सारखाच एक शेअर आहे, ज्याच नाव आहे ‘ क्रेसेंडा सोल्युशन्स लिमिटेड शेअर’. या शेअरने गुंतवणूकदारांना केवळ एका वर्षातच तब्बल ५२०० टक्क्यांची परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी केवळ ०.६१ रुपयांचा किमतीचा शेअर्स आज ३२ रूपयांपेक्षा जास्त किमतीवर पोहोचला आहे. ३ मे २०२१ रोजी या स्टॉकची किंमत केवळ ०.३२ पैसे इतकीच होती.
जर तुम्ही या शेअर्समध्ये वर्षभरापूर्वी एक लाख रूपयांची गुंतवणूक केली असती तर तुम्हाला आज तब्बल १.०५ कोटी रुपयांचा परतावा मिळाला असता. हा शेअर्सची १ महिन्यात ४४.६० रुपयावरून ३३.७५ रुपयांवर घसरण झाली आहे. त्यामुळे या शेअर्सचे २५ टक्क्यांचे नुकसान झाले आहे. मागील सहा महिन्यात हा शेअर्स किंमत ७०० टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
पेनी स्टॉक खुप जोखमीचे असतात कारण हे स्टॉक क्षणातच खाली येतात. पेनी स्टॉकला लोअर सर्किट लागल्यास गुंतवणूकदाराने गुंतवलेली रक्कम निम्म्याहून कमी येते. हा स्टॉक जरी जोखमीचा असला तरी ‘ राज रेयॉन इंडस्ट्रीज आणि क्रेसेंडा सोल्युशन्स लिमिटेड ‘ सारखे शेअर्स गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देते.
महत्वाच्या बातम्या
सौरव गांगुलीने राजीनाम्याचा प्रँक केल्यानंतर चाहत्यांनी केले ट्रोल, भन्नाट मीम्सचा पडला पाऊस
UPSC पास झाला! सर्वत्र आनंदोत्सव, मिठाई वाटली, चॅनेल्सला मुलाखती दिल्या; नंतर भयंकर सत्य आले समोर
अशोक सराफ शर्टाचे पहिले बटन नेहमी उघडे का ठेवायचे? कारण ऐकून चकीत व्हाल
IPL पाठोपाठ टीम इंडियानेही डावलले, ‘या’ दिग्गज स्टार गोलंदाजाची कारकीर्द जवळपास संपुष्टात