Share

बेकायदेशीर बांधकाम तोडत होते अधिकारी; कम्युनिस्ट नेत्याने दिले बुलडोझर थांबवण्याचे आदेश, म्हणाल्या…

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच सीपीआयच्या नेत्या वृंदा करात जहांगीरपुरी येथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने जमियत उलेमा-ए-हिंदच्या याचिकेवर सुनावणी करताना जहांगीरपुरीतील बेकायदा बांधकामे पाडण्यास स्थगिती दिली आहे. त्यानंतर त्या बांधकामांवर होणाऱ्या कारवाईला थांबवण्यासाठी तिथे पोहचल्या आहे. (vrinda karat rushed jahangirpuri with supreme court notice)

अधिवक्ता दुष्यंत दवे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सर्वोच्च न्यायालयाने जहांगीरपुरीमध्ये सध्याची बांधकामे कायम ठेवावी, असे सांगितले. त्यानंतर सीपीआय नेत्या आणि खटल्यातील याचिकाकर्त्या वृंदा करात घटनास्थळी पोहोचल्या आणि म्हणाल्या की सर्वोच्च न्यायालयाने सकाळी १०.४५ वाजताच याला स्थगिरी देण्याचा निर्णय घेतला होता. मी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी येथे आली आहे.

वृंदा करात यांनी जहांगीपुरी येथे तैनात असलेल्या उच्च पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा केली. पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार बुलडोझरची कारवाई थांबवण्यात येईल, असे त्यांनी संवादानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. करात म्हणाल्या, मी येथे एकच गोष्ट घेऊन आले आहे की, जी बांधकामे तोडली जात आहे ती माझ्या मते बेकायदेशीर, घटनाविरोधी होती.

तसेच आमच्या वरिष्ठ वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टाने यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले, पण आदेश असूनही तोडफोड सुरू असल्याचे मला समजले. म्हणूनच मी इथे आले आहे, असेही वृंदा करात यांनी म्हटले आहे.

अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगणे ही माझी जबाबदारी आहे. विशेष पोलीस आयुक्त दीपक पाठक यांच्याशी आम्ही येथे बोललो आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे येथे बुलडोझर चालणार नाही, अशी ग्वाही वृंदा करात यांनी दिली आहे.

वृंदाने करात यांनी सांगितले की, जेव्हा त्या येथे पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की बुलडोझर सुरु असून कारवाईचे काम चालू होते.हा न्यायालयाचा अपमान आहे. मी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तेव्हा वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. ते आल्यावर त्यांच्यासोबत संवाद झाला. मी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सांगितल्यावर त्यांनीच बुलडोझर थांबणार असल्याचे सांगितले.

तसेच तुम्ही न्यायालयाचा अवमान करत आहात, असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले. तुम्ही कायदा, राज्यघटना, वैयक्तिक हक्कांची पायमल्ली केली आहे, पण किमान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा तरी आदर करा. मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवली आणि त्यानंतर बुलडोझर थांबवण्याचे आश्वासन अधिकाऱ्याने दिले, असे वृंदा करात यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
भोंग्याच्या राजकारणामुळे हिंदुत्व बदनाम होतंय, संजय राऊतांची भाजपवर टीका
मशिदींवरील भोंग्यांबाबत संजय राऊतांचं थेट मोदींना आवाहन; म्हणाले, ‘हिंमत असेल तर…’
सिल्व्हर ओक हल्ला! अटकेतील कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट; जामिनासाठी पैसेही नाही

राजकारण ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now