Share

मोठी बातमी! सदावर्तेंना न्यायालयाचा दुसरा दणका, पोलिस कोठडीतील मुक्काम ‘या’ तारखेपर्यंत वाढवला

gunratna sadavarte

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला चढवला होता. या प्रकरणी अनेक कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचेही नाव आले होते. त्यामुळे त्यांनाही गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज किल्ला कोर्टात हजर करण्यात आले.

कोर्टाने त्यांच्याविरोधात निकाल देत त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता पुन्हा कोर्टाने त्यांना दणका देत त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यांना आजही कोर्टाने दिलासा दिला नाही. आज त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपणार होती.

आता त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडीतच मुक्काम ठोकावा लागणार आहे. दुसरीकडे किरीट सोमय्या यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. त्यांचाही जामीन अर्ज आज कोर्टाने फेटाळला आहे. नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर उद्या निकाल देण्यात येणार आहे.

दरम्यान, न्यायाधीश सावंत यांनी दोन्ही बाजूंच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकल्यानंतर दोन दिवसांच्या कोठडीचे आदेश दिले होते. सदावर्तेंच्या बाजूने ऍड. महेश वासवानी यांनी युक्तीवाद केला होता. तर 109 एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ऍड. संदीप गायकवाड यांनी बाजू मांडली होती. सरकारनेही आपला वकील तयार ठेवला होता आणि त्यांनीही आपली बाजू मांडली होती.

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारच्या वतीने युक्तीवाद केला. कोर्टाच्या या निकालानंतर इतर एसटी कर्मचाऱ्यांना जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करता येणार आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड गोंधळ केला होता.

या आंदोलकांनी घराच्या दिशेने चपला, दगडं भिरकावल्या होत्या. त्यानंतर रात्री उशीरा एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलीसांनी अटक केली होती. त्यांना ज्या कोर्टात हजर करण्यात येणार होते त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच मोबाईल फोन नेण्यासही बंदी घालण्यात आली होती.

इतरांना या परिसरात प्रवेश दिला गेला नव्हता. त्यानंतर कोर्टात प्रत्येक वकीलाने आपली बाजू मांडली. सुमारे तीन तास हा युक्तीवाद चालला होता. त्यानंतर न्यायाधीशांनी निकाल सुनावला. 109 एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती त्यामुळे त्यांना जामिनासाठी अर्ज करता येणार होता.

महत्वाच्या बातम्या
ST कामगारांचा उद्रेक समर्थनीय नसला तरी त्यांच्यावर ही वेळ का आली? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल
मद्यधुंद खेळाडूने चहलला 15 व्या मजल्यावरील बाल्कनीत लटकावले, घटनेबाबत कळताच रवी शास्त्रींचा उडाला संताप, म्हणाले…
बॉलिवूडमध्ये शोककळा! मुलाच्या मृत्यूनंतर 2 महिन्यातच प्रसिद्ध अभिनेत्याचं दुःखद निधन, मनाला चटका लावणारी घटना

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now