Politics: गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे विरोधी पक्षातील नेत्यांचे भ्रष्टाचार समोर आणत आहेत. मात्र, आता हे प्रकरण किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ करणार असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांना कोर्टाने मोठा दणका दिला आहे.
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. २४ एप्रिल २०२३ पर्यंत मुश्रीफ यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणात आता भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
हायकोर्टाने पुण्याच्या प्रधान जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सोमय्या यांच्या विरोधात चौकशी करण्यास सांगितले आहे. हसन मुश्रीफ यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा म्हणाले की, माझ्या अशिलाविरुद्ध फसवणुकीच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेला एफआयआर हा कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर आहे. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे माझ्या अशिलाला सत्तेचा वापर करून त्रास देत असल्याचे त्यांनी सांगितले.
हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? असा खडा सवाल न्यायालयाने केला. याचिकेत मुश्रीफ यांनी आपल्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाशी संबंधित एफआयआर राजकीय सूडबुद्धीने नोंदवण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
जेणेकरून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या प्रकरणात सक्रिय होऊ शकेल. सरकारी वकिलांनी मुश्रीफ यांच्या याचिकेला कडाडून विरोध केला. या प्रकरणातील दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने २४ एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांच्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे निर्देश पोलिसांना दिले.
दरम्यान, कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर ईडीने अलीकडेच छापेमारी केली होती. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ईडीकडून ३५ कोटींच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रद्द करण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा सख्खा भाऊ ईडीच्या ताब्यात; राजकीय वर्तूळात खळबळ
नागालॅंडमध्ये झालं तसंच उद्या महाराष्ट्रातही होणार; भाजप राष्ट्रवादी युतीचा प्लॅन खासदाराने फोडला
मंदीरात प्रसाद विकणाऱ्याने मागवले मटन; नोकरी गेली तरी स्विगीबाॅयने मंदीरात नेले नाही मटन