Share

‘हा सर्व प्रकार काल्पनिक’ म्हणत कोर्टाने संदीप देशपांडेची कस्टडी मागणाऱ्या पोलिसालाच झापलं

मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेत असताना एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्या होत्या. त्यानंतर संदीप देशपांडे आणि त्यांच्यासोबत असलेले संतोष धुरी तिथून पळून गेले होते. त्यानंतर संदीप देशपांडेंसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जखमी महिला पोलिस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच महिला कॉन्स्टेबलचा जबाब नोंदवून घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी दिलेल्या जबाबानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी पोलिसांनी संदीप देशपांडे, संतोष धुरी आणि संदीप देशपांडेंचा वाहनचालक या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक कासार यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर साक्षीदार म्हणून जखमी कॉन्स्टेबलचा जबाब नोंदवण्यात आला.

हे सगळं झाल्यानंतर संदीप देशपांडे मात्र अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर त्यांनी अटकपुर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतली होती. त्यांना अटकपुर्व जामीनही मिळाला. पण त्यांची कोठडी मागणाऱ्या पोलिसांनचा आज कोर्टाने झापलं आहे. हा सर्व प्रकार काल्पनिक असल्याचे कोर्टाचं मत आहे. हे प्रकरण कोणत्याही तथ्यावर आधारित नाही.

आरोपींच्या कोठडीची कोणतीही ठोस कारणे नाहीत. खास अधिकारांच्या आणि कल्पनाशक्तिच्या जोरावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. देशपांडे आणि धुरी यांचा जाणीवपुर्वक इजा पोहोचवण्याचा हेतू नव्हता असेही निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. कोर्टाने हा निर्णय दिल्यानंतर संदीप देशपांडेनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले की, ही पोलिसांना नसून सरकारला चपराक आहे. राज्य सरकारच्या दबावाखाली पोलिस काम करत होते. चुकीची कलमं लावण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. आम्ही सरकारविरोधात बोलतो, आवाज उठवतो, म्हणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होतो. मात्र आमचा न्यायालयावर विश्वास आहे.

यामध्ये आमचा कुणालाही धक्का लागला नव्हता. तेच मत कोर्टाने नोंदवलं आहे. आणि त्याआधारेच हा निर्णय दिला आहे. कुठलाही कटकारस्थान करण्याचा हेतू आरोपींचा नव्हता असं कोर्टाने म्हटलं आहे, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आणि राज्य सरकारवरही सडकून टीका केली.

महत्वाच्या बातम्या
रोहित शर्माची एक्स गर्लफ्रेंड कॅमेऱ्यासमोर झाली टॉपलेस, सोशल मिडीयाचे वाढवले तापमान, पहा फोटो
प्रकाश आंबेडकरांचे ईडीला थेट आव्हान; म्हणाले, गां** दम असेल तर मला उचलून दाखवा आणि मग…
सततचा सेक्स, ड्रग्ज आणि दारूच्या अतिसेवनामुळे प्रसिद्ध अभिनेत्याची झाली भयानक अवस्था
‘गांधी हत्या करणाऱ्या नथूरामचे समर्थन करणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायच्या’; केतकीच्या प्रकरणावर आव्हाडांची पोस्ट

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now