राज्याची राजधानी मुंबईतून एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. मुंबईतल्या एका विशेष न्यायालयाने एका २१ वर्षीय विद्यार्थ्याचा जामीन मंजूर केला आहे. त्याने १६ वर्षीय मैत्रिणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. (court release 21 year old criminal)
आरोपीच्या वयाचा संदर्भ देत न्यायालयाने सांगितले की, त्याचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्याला स्वत:ला स्थिर करण्याची आणि त्याचे भविष्य सुरक्षित करण्याची संधी देण्यात यावी. त्यामुळे त्याला जामीन दिला जात आहे.
तरूण अल्पवयीन मुलीला घेऊन पळून गेला होता, त्यानंतर त्याने तिचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला असा आरोप होता. या तरुणाने ३० दिवस तुरुंगात काढले आहेत. विशेष न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ दिला ज्यामध्ये किशोरवयीन मुलांच्या लैंगिक परिपक्वताचे पैलू सांगण्यात आले होते. तसेच अशा प्रकरणांमध्ये कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्या, तेही सांगण्यात आले होते.
मुंबई उच्च न्यायालयाने, अशाच एका प्रकरणाबाबात बोलताना लैंगिक इच्छा बदलत असते असे सांगितले आहे. तसेच किशोरवयीन मुलांचे लैंगिक वर्तन नमुने तपासण्यासाठी कोणतेही गणितीय सूत्र नाही, असे मत मांडले होते. तरुण वयात असताना मुलांना त्यांच्या लैंगिक गरजा समजू लागतात. आजची तरुणाई लैंगिक संबंधांबाबत अधिक जागरूक असल्याचेही उच्च न्यायालयाने म्हटले होते.
यासोबतच उच्च न्यायालयाने आपल्या निकालात असेही म्हटले आहे की, जेव्हा एखादा मुलगा आणि अल्पवयीन मुलगी प्रेमात असतात. तसेच पालकांच्या संमतीशिवाय एकत्र राहण्याचा निर्णय घेतात, तेव्हा अशा प्रकरणांमध्ये अनेक बाबी विचारात घेतल्या पाहिजेत.
तसेच त्यामध्ये अल्पवयीन व्यक्तीचे वय, हे कृत्य हिंसक आहे की नाही आणि गुन्हेगारात पुन्हा गुन्हा करण्याची क्षमता आहे की नाही यासारख्या घटकांचा समावेश आहे. त्यानंतर त्याला शिक्षा किती द्यायची याचा निर्णय घेतला पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
विवाहित महिला माझ्याकडे आल्या तर मी एका रात्रीचे ५ हजार घेतो; सेक्स वर्करने सांगितले धक्कादायक वास्तव
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट करमुक्त होऊ शकतो, तर ‘झुंड’ का नाही? निर्मात्यांचा जळजळीत प्रश्न
“द काश्मीर फाइल्समध्ये दाखवलेल्या अनेक घटना खोट्या, काश्मिरी पंडितांना वाचवायला मुस्लिम अधिकारी आले होते”