Share

हिंगणघाट जळीतप्रकरणातील आरोपीला जन्मठेप; एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेला जिवंत जाळले होते

दोन वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. आता तिला जाळणाऱ्या नराधामाचा म्हणजेच विक्की नगराळे याचा गुन्हा सिद्ध झाला असून त्याला जन्मठेपाची शिक्षा देण्यात आली आहे. (court punish to vicky nagrale)

न्यायालयाने आरोपीला दोषी करार दिल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अंतिम सुनावणीवेळी सरकारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या ऍड. उज्ज्वल निकम यांनी आज अनेक दाखले दिले. थरकाप उडविणाऱ्या या जळीतप्रकरणात मृत्युशी झुंझ देणाऱ्या अंकिताचा १० फेब्रुवारी २०२० ला नागपूरमधील रुग्णालयात मृत्यु झाला होता.

भरचौकात अंकिताला जाळल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली होती. तसेच सगळ्यांचे लक्ष या निकालाकडे लागलेले होते. आज या घटनेला दोन वर्षे पुर्ण झाली आहे. आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर बी भागवत यांनी स्पष्ट केले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना केंद्रस्थानी ठेवून आरोपीच्या शिक्षेबाबत दोन्ही बाजूंची मते जाणून घेतल्यावर गुरुवारी या प्रकणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आज न्यायालयाने दोषी विक्की नगराळे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

तसेच संपुर्ण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या या घटनेच्या निकालादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगणघाट येथील सत्र न्यायालयाच्या आवारात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बुधवारी तब्बल १३ अधिकारी ९८ कर्मचारी तसेच दंगल नियंत्रक पथक पाहरा देण्यासाठी उभे होते.

दरम्यान, ३ फेब्रुवारी २०२० रोजी नंदोरी चौकात अंकिता बसमधून खाली उतरली होती. नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जात असताना आरोपी अचानक तिच्याजवळ आला. त्यानंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. त्यानंतर तिला तातडीने नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिची मृत्युची सुरु असलेली तिची झुंझ अपयशी ठरली आणि १० फेब्रुवारी २०२० ला तिचा मृत्यु झाला होता.

महत्वाच्या बातम्या-
डुग्गूच्या अपहरणकर्त्याचे पुणे पोलिसांनाच आव्हान, पोलिस चौकीपासूनच झाले होते अपहरण
‘ब्राह्मण ही जात नसून जगण्याचे उत्तम साधन आहे, जन्मापासून मरेपर्यंत सौभाग्यासाठी काम करतात’
मोदींमुळे उध्वस्त झालो; कर्जबाजारी व्यापाऱ्याने लाईव्ह व्हिडीओ करत कुटुंबासह घेतले विष

राज्य

Join WhatsApp

Join Now