राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला चढवला. या प्रकरणी अनेक कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचेही नाव आले होते. त्यामुळे त्यांनाही आज गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना दणका देत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायाधीश सावंत यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली होती. इतर 109 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती त्यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
न्यायाधीश सावंत यांनी दोन्ही बाजूंच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकल्यानंतर हे आदेश दिले आहेत. सदावर्तेंच्या बाजूने ऍड. महेश वासवानी यांनी युक्तीवाद केला होता. तर 109 एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ऍड. संदीप गायकवाड यांनी बाजू मांडली होती. सरकारनेही आपला वकील तयार ठेवला होता.
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारच्या वतीने युक्तीवाद केला. कोर्टाच्या या निकालानंतर इतर एसटी कर्मचाऱ्यांना जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करता येणार आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड गोंधळ केला होता.
या आंदोलकांनी घराच्या दिशेने चपला, दगडं भिरकावल्या होत्या. त्यानंतर रात्री उशीरा एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलीसांनी अटक केली होती. त्यांना ज्या कोर्टात हजर करण्यात येणार होते त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच मोबाईल फोन नेण्यासही बंदी घालण्यात आली होती.
इतरांना या परिसरात प्रवेश दिला गेला नाही. त्यानंतर कोर्टात प्रत्येक वकीलाने आपली बाजू मांडली. सुमारे तीन तास हा युक्तीवाद चालला होता. त्यानंतर न्यायाधीशांनी निकाल सुनावला. 109 एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे त्यांना जामिनासाठी अर्ज करता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
औरंगबादेच्या महाराजांचा सेक्स व्हिडीओ झाला व्हायरल, वारकरी सांप्रदायाने केली कारवाईची मागणी
‘अरे वेड्या.., शेतकरी आंदोलनात ज्या शेतकऱ्यांना चिरडून मारलं त्याची जबाबदारी कुणाची?’
पोलिसांनी समन्स बजावताच किरीट सोमय्या मुलासोबत झाले अंडरग्राऊंड, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण