लग्नानंतर पार्टनरसोबत एकांतात वेळ घालावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे अनेकजण हनिमून प्लॅन करताना दिसतात. काही वेळा हा प्लॅन ती जोडपीच करतात, तर काहीवेळा हा प्लॅन त्यांना घरचे सदस्य करुन देतात. पण हनिमूनला आलेल्या एका कपलसोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. (couple leave honeymoon hotel)
आपल्याच फॅमिलीकडून या कपलला हनिमून पॅकेज घेणं महागात पडलं आहे. ज्यामुळे त्यांना चक्क आपलं हॉटेलच सोडून पळावं लागलं आहे. जे काय घडलं ते स्वत: त्या कपलने रेडिटवर शेअर केलं आहे. जाणून घेऊया नक्की त्यांच्यासोबत काय घडलं.
झाले असे की नवविवाहीत जोडप्याला आपल्या आईवडिलांकचडून हनिमून पॅकेज मिळाले. या पॅकेजमुळे ते दोघेही खुप खूश होते. पण या पॅकेजसोबत त्यांनी एक अटही ठेवली की हनिमूनला ते पालकही सोबत येतील आणि ग्रुप ट्रॅव्हल करतील. जोडप्याने ही गोष्टी मान्य केली.
अशात जेव्हा ते हनिमूनला गेले, तेव्हा मात्र जोडप्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यांना एकांतात वेळ घालवता येत नव्हता. ते कुठेही जात असले तरी त्यांचे पालक त्यांच्यासोबत जात होते. यासर्व गोष्टीमुळे ते दोघेही खुप अस्वस्थ झाले होते.
हनिमूनच्या वेळी मुलाचे आईवडिल सकाळी ६ वाजता त्यांच्या रुमचा दरवाजा वाजवायचे आणि नंतर ते सर्वजण नाश्ता करुन फिरायला निघायचे. त्यानंतर दुपारचे आणि रात्रीचे जेवणही ते सोबत करायचे. जोडप्याने त्याच्या आईवडिलांशी एकातांत वेळ घालवण्याबाबत मागणी केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.
त्यानंतर त्या तरुणाने आईवडिलांशी मोकाळपणाने यावर बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी हैराण करणारे उत्तर दिले. ते म्हणाले की, तुमचा हनिमून आम्ही स्पोन्सर केला आहे. त्यानंतर वैतागलेल्या जोडप्याने हॉटेलमधून पळून जाण्याची योजना आखली आणि ती यशस्वही झाली.
महत्वाच्या बातम्या-
२ जीच्या निराशेतून निघून भारताने वेगाने ५ जी आणि ६ जीकडे वाटचाल केलीये- पंतप्रधान नरेंद्र मोदी
शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय? ते उध्वस्त करा; मनसेचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
टरबूजा, भोंग्या…प्रसिद्ध अभिनेत्रीने देवेंद्र फडणवीसांना शेलक्या शब्दांत झोडपले