अर्थसंकल्पीय संसद अधिवेशन सुरू असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावर सत्ताधारी आणि विरोधकांमधील विविध खासदारांची भाषणे पूर्ण झाली. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आजच्या भाषणादरम्यान कॉंग्रेसवर सडकून टीका केली आहे. (corona spread in the country due to maharashtra congress)
देशाच्या अधोगतीपासून, महागाई आणि कोरोना या साऱ्याला काँग्रेसच जबाबदार असल्याची टीका करत मोदी यांनी केली. मोदी म्हणाले, ‘पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. काँग्रेसवाले ही परिस्थिती कशी बिघडेल याची वाट पाहत होते. जेव्हा डब्ल्यूएचओ सांगत होते की लोकांनी आहे तिथेच थांबावे, जगाला हा संदेश दिला जात होता.’
मात्र काँग्रेसने तेव्हा हद्द पार केली, महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, दिल्लीतही गाड्यांवर माईक लावून लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी सांगितले जात होते, असा आरोप मोदी यांनी केला. देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र कॉंग्रेस जबाबदार असल्याचे मोदी म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस सरकारच्या काळात महागाई दर दुहेरी अंकांमध्ये पोहोचला होता. तेव्हा महागाई आवाक्याबाहेर आहे, असं काँग्रेस सरकार म्हणत होतं. पण आता भाजप सरकारमध्ये कोरोनाचं संकट असतानाही महागाई 5.3 टक्के राहिली आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींच्या आरोपांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींच्या आरोपाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, ‘कोरोना लॉकडाऊनमध्ये काँग्रेसनं माणूसकीचं नातं जपलं, लोकांकडे पैसे नव्हते. उलट काँग्रेसनं मदत केली म्हणून शाबासकी दिली पाहिजे.’
पुढे बोलताना पटोले म्हणाले, ‘रेल्वेचा कंट्रोल तर तुमच्याकडेच होता. रेल्वे तुम्हीच सुरु केलीत. उत्तर प्रदेशमधील गंगेतील प्रेतांचा खच पडला, तिकडे कोरोना नियंत्रण करता आलं नाही, हे पाप झाकण्याकरता काँग्रेसवर आरोप केले जातायेत,’ असा पलटवार पटोले यांनी भाजपावर केला.
महत्त्वाच्या बातम्या
नमाज पढून शाहरुख खानने लतादीदींच्या पार्थिवावर फुंकर मारली; लोकांनी मात्र काहीतरी वेगळंच समजलं…
JIOच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी: दोन दिवस सेवा ठप्प झाल्याने कंपनी ग्राहकांना देणार ‘हे’ मोठे गिफ्ट
जेव्हा लता मंगेशकर यांना जीवे मारण्याचा झाला होता प्रयत्न, असा वाचला होता त्यांचा जीव
आपण इतक्या खालच्या पातळीवर आलोय की.., शाहरूखला ट्रोल करणाऱ्यांवर उर्मिला संतापली