Coriander : कोथिंबीरीच्या दराने मोडले सर्व विक्रम, एका जुडीसाठी मोजावे लागले १६० रुपये, शेतकरी मालामाल

Coriander | एकीकडे पावसाळ्यात भाजीपाल्यांचे भाव कमी होत असताना दुसरीकडे मात्र कोथिंबीरीने भाव खाल्ला आहे. नाशिकमध्ये कोथिंबीरीने उच्चाकी दर गाठला आहे. पंचवटीतील मार्केट यार्डातील लिलावात कोथिंबीरीला शेकडा १६ हजार रुपये भाव मिळाला.

शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला पण ग्राहकांच्या खिशावर ताण आला. ग्राहकांना एका जुडीसाठी तब्बल १६० रुपये मोजावे लागले. सर्वसामान्यांच्या खिशाला ताण आला पण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद दाटून आला. त्यांनी गुलाल उधलत या उचांकी दराचे स्वागत केले.

नाशिक या जिल्ह्याची ओळख मुंबईला भाजीपाला पुरवणारा जिल्हा अशी आहे. पण कोरोनाची साथ गेली आता तेथे भाजीबाजारात महागाईची साथ आली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने विविध फळभाज्यांचा आणि पालेभाज्यांचा दर वाढला आहे.

पावसाळ्यात भाजीपाल्याचे दर वाढतात असा शेतकऱ्यांचा अनुभव होता. मंगळवारी तसंच घडलं. दिंडोरी रोडवरील मुख्य भाजी मार्केटमधील लिलावात कोथींबीरीने शेतकऱ्यांची चांदीच केली. नांदुरमधमेश्वर येथील युवराज धुमाळ या शेतकऱ्याच्या कोथिंबीरीला शिवशंभो व्हेजिटेबल कंपनीने प्रती शेकडा तब्बल १६ हजार रुपये भाव दिला.

शेतकऱ्याला आनंद झाला पण ग्राहकांना एका जुडीसाठी १६० रुपये मोजावे लागले. या लिलावावेळी योगेश आमले, सुरेश ढिकले, कुमार केतकडेकर, अशोक पवार उपस्थित होते. विक्रमी भाव मिळताच धुमाळ यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला. पण दुसरीकडे महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्य बाजारातच भाव जास्त असल्याने किरकोळ बाजारात जर ग्राहकाने कोथिंबीर घेतली तर तिची किंमत २०० रुपयांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, युवराज धुमाळ या शेतकऱ्याचा आनंद साजरा करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. कोथिंबीरीला विक्रमी भाव मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

महत्वाच्या बातम्या
Gold and Silver : अरे वा! दिवाळी, दसऱ्याच्या आधीच सोनं झालं स्वस्त, आताच खरेदी करा नाहीतर होईल महाग
congress : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; दिग्विजय सिंह यांची माघार
eknath shinde : “मुख्यमंत्री साहेब माझ्या बापाला वाचवा”, लेकीचं मुख्यमंत्र्यांना काळजाचा ठोका चुकवणार पत्र, वाचा नेमकं काय पत्रात?
eknath shinde : “मुख्यमंत्री साहेब माझ्या बापाला वाचवा”, लेकीचं मुख्यमंत्र्यांना काळजाचा ठोका चुकवणार पत्र, वाचा नेमकं काय पत्रात?