Share

तुझ्या घरासमोर २०० बिहारी उभे करेल, चाकू खूपसून तुला मारून टाकेल; अभिनेत्रीला नोकराची धमकी

प्रसिद्ध कलाकार माही विज आणि जय भानुशाली यांच्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, त्यांच्या घरातील नोकराने त्यांना आणि त्यांची मुलगी ताराला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी हे दाम्पत्य पोलिसात गेले होते. तसेच नोकराला तुरुंगातही टाकण्यात आले होते. पण आता त्याची सुटका झाली आहे. (cook threating mahi vij)

नुकतेच माहीने मुंबई पोलिसांना टॅग करत काही ट्विट केले होते जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. मात्र, नंतर तिने हे ट्विट डिलीट केले. या ट्विटमध्ये तिने सांगितले होते की, त्यांच्या घरात काम करणाऱ्या कुकने त्यांच्या कुटुंबीयांना चाकु खुपसून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

तसेच एका मुलाखतीत सुद्धा तिने हे सांगितले होते. माही विजने अलीकडेच ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कुक फक्त ३ दिवसांपासून घरात काम करत होता आणि मला घरात चोरी होत असल्याचे कळले. याबाबत मी जयला बोलून कुकचा पगार काढण्यास सांगितला, तेव्हा तो पुर्ण महिन्याचा पगार मागू लागला.

पुढे माही म्हणाली की, त्यानंतर त्याने जयला धमकी दिली आणि २०० बिहारींना आणून उभे करू, असे सांगू लागला. तो खूप दारूच्या नशेत होता आणि शिवीगाळही करू लागला. त्यांच्या या कृत्यानंतर आम्ही पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. माहीने मुलाखतीदरम्यान सांगितले की, ती आपली मुलगी ताराबाबत खूप चिंतित आणि नाराज आहे.

माही विजने मुलाखतीदरम्यान पुढे सांगितले की, तक्रारीनंतर पोलिसांनी कुकला अटक केली होती, मात्र त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर आम्हाला खुप भिती वाटत आहे. तो फोनवर धमक्याही देत आहे, त्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे.

तसेच जर त्याने मला चाकु खुपसून मारलं तर? मला माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची खूप काळजी वाटते. मला माझ्या मुलीची खुप चिंता वाटत आहे, असेही माहिने म्हटले आहे. माही-जयचे २०११ मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या ८ वर्षानंतर त्यांच्या घरी मुलगी झाली. दोघांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
फडणवीसांसह ब्राह्मण नेत्यांचं भाजपमध्ये खच्चीकरण; राजकीय आखाड्यात ब्राह्मण महासंघाची उडी
IPL गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूला रोहित शर्माने दिली संधी, पहिल्यांदाच दिसणार भारतीय संघात
त्यांच्याकडे एकच ‘नाथ’ बाकी सर्व ‘अनाथ’, मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर सडकून टीका

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now