गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. राज्यात भाजपला डावलून महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) स्थापन झाल्यानंतर अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. आरोप-प्रत्त्युर पाहायला मिळत आहे.
अनेकदा महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. तर आता कॉंग्रेस मोठं पाऊल उचणार असल्याच बोललं जातं आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जातं आहे. याबाबत अखेरचा निर्णय काँग्रेस शिर्डीत होणार आहे.
काँग्रेस पक्षाने आपले अधिवेशन 1 आणि 2 जून रोजी शिर्डीत आयोजित केले आहे. महाविकास आघाडी सरकारबाबत या अधिवेशनात मोठा निर्णय घेतला जाणार असल्याच बोललं जातं आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या 1 आणि 2 जून हे दिवस महत्त्वाचे असणार आहे.
काँग्रेसच्या विषयाबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळात नसल्याचे अनेकदा कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले आहे. राज्यात राज्य सरकारमध्ये असूनही काँग्रेसला मिळत असलेली दुय्यम वागणूक विषयी देखील अनेकदा कॉंग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेसच्या विषयाबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळात नसल्याचे अनेकदा कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले आहे. राज्यात राज्य सरकारमध्ये असूनही काँग्रेसला मिळत असलेली दुय्यम वागणूक विषयी देखील अनेकदा कॉंग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कालच काँग्रेस हायकमांडने राज्यातील प्रमुख मंत्र्यांना तातडीने दिल्लीत बोलवून घेतले होते. दिल्ली दरबारी कॉंग्रेस हायकमांडकडून निर्णय होणार असल्याच बोललं जातं होतं. मात्र दिल्लीतील हायकमांडसोबतची बैठक आता लांबणीवर पडली असल्याच बोललं जातं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लागवली; राणेंचा राऊतांवर गंभीर आरोप
बॉलिवूडला टक्कर! ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाने रचला इतिहास, तीन दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
IPS होऊनही असमाधानी, ओंकार पुन्हा परीक्षेला बसला अन् …; मुलाचं यश भावून आईही भावुक झाली
लेकीच्या लग्नात हुंडा द्यावा लागू नये म्हणून एका पित्याने ‘असा’ रचला कट; वाचून बसेल जबर धक्का