गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. राज्यात भाजपला डावलून महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) स्थापन झाल्यानंतर अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. आरोप-प्रत्त्युर पाहायला मिळत आहे.
अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. ‘कॉंग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. रामदास आठवलेंच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आठवले याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले, ‘काँग्रेस पाठिंबा काढणार आणि तीन पक्षाचं सरकार पडणार असल्याच दिसत आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर अडीच वर्षांसाठी आम्ही सत्ता बनवणार असल्याचेही आठवले म्हणाले.
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ‘आम्ही शिवसेनेला अडीच वर्षाचा फॉर्म्युला दिला होता, पण त्यांनी आम्हाला धोका दिला, असा गंभीर आरोपही आठवलेंनी केला आहे. महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असल्याने तेही आम्हाला राज्यसभा निवडणुकीत मतदान करु शकतात,’ असंही आठवले म्हणाले.
दरम्यान, ‘राजे आमच्या सोबत पहिल्यापासून राहिले नाही. राजेंनी सुरवातीपासून अपक्ष राहण्यावर ते ठाम होते. त्यामुळे संभाजीराजेंना भाजपने नक्की काहीतरी दिले असते,’ असं रामदास आठवले यावेळी बोलताना म्हणाले. यापूर्वी संभाजीराजे छत्रपती यांना भाजपने यापूर्वी संधी दिली होती. मात्र शिवसेनेने शब्द पाळला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कॉंग्रेस सत्तेतून बाहेर पडणार? काँग्रेस पक्षाने आपले अधिवेशन 1 आणि 2 जून रोजी शिर्डीत आयोजित केले आहे. महाविकास आघाडी सरकारबाबत या अधिवेशनात मोठा निर्णय घेतला जाणार असल्याच बोललं जातं आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या 1 आणि 2 जून हे दिवस महत्त्वाचे असणार आहे.
काँग्रेसच्या विषयाबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळात नसल्याचे अनेकदा कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले आहे. राज्यात राज्य सरकारमध्ये असूनही काँग्रेसला मिळत असलेली दुय्यम वागणूक विषयी देखील अनेकदा कॉंग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांनी होळकरांच्या जमिनी ढापल्या; गोपीचंद पडळकरांचे पवारांवर पुन्हा गंभीर आरोप
दूध देणे बंद केल्यानंतर गायींना बेवारस सोडले, तर दाखल होणार गुन्हा; सरकारचा मोठा निर्णय
भाजपा नेत्यांच्या इशाऱ्यावर दिपाली सय्यद यांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाल्या “तुमच्यात तेवढी…”