पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षात एकच खळबळ उडाली आहे. असे असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी गुरुवारी २०२४ च्या निवडणूकीवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी आप आणि तृणमूल काँग्रेस पक्षांसोबत युती करणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी एक हैराण करणारे वक्तव्य केले आहे. (congress talk about aap)
येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत आप आणि तृणमूल काँग्रेसच्या आघाडीत काँग्रेस सहभागी होणार आहे. तसेच या आघाडीत काँग्रेस लहान भावाची भूमिका स्वीकारण्यात तयार आहे, असे मोठे वक्तव्य पी चिदंबरम यांनी केले आहे.
तसेच पक्षाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवासाठी एकट्या गांधी कुटुंबाला जबाबदार धरता येणार नाही, असेही ते म्हणाले. जी-२३ किंवा कॉंग्रेसच्या ‘असंतुष्ट’ नेत्यांच्या बैठकीनंतर एका दिवसानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे वक्तव्य केले आहे.
अनेक काँग्रेस नेत्यांप्रमाणेच, चिदंबरम यांनीही पुष्टी केली की सोनिया गांधी यांनी रविवारी CWC बैठकीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह पक्षाच्या पदांचा राजीनामा देण्याची ऑफर दिली होती. परंतु CWC ने ती स्वीकारली नाही. तर, आता आमच्याकडे कोणता पर्याय आहे? काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाच्या निवड ऑगस्ट महिन्यात होईल. पण आता आणि ऑगस्ट दरम्यान आपण काय करायचे?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ते म्हणाले की, सोनिया गांधींनी लवकर निवडणुका घेण्याचे सुचवले होते, परंतु बहुतेक नेत्यांनी ते मान्य केले नाही. जी-२३ च्या कपिल सिब्बल सारख्या नेत्यांनी गांधी घराण्याला त्यांच्या निवडणुकीतील पराभवासाठी उघडपणे लक्ष्य केले. तसेच त्यांनी म्हटले की त्यांनी पक्षाचे नेतृत्व सोडले पाहिजे आणि नवीन लोकांना संधी दिली पाहिजे.
चिदंबरम म्हणाले, गांधी कुटुंबाने जबाबदारी घेतली आहे, जसे मी गोव्यासाठी आणि इतर राज्यांसाठी जबाबदारी घेतली आहे. ती जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत आहे, असे बोलणे योग्य ठरणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
टाटासह ‘या’ दोन शेअर्सने झुनझुनवालांना केले मालामाल, एका दिवसात कमावले तब्बल ८६१ कोटी
९० किमी सायकल चालवून ‘आप’चा आमदार आला शपथविधीला; पगार, कार, सुरक्षा घेण्यास दिला नकार
अनन्यावर चढला बोेल्डनेसचा फिवर, भरपार्टीत घालून आली स्विमसूटसारखा ड्रेस; पँट नसल्यामुळे लोकांनी केलं ट्रोल