कॉंग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस हायकमांडकडून तब्बल नऊ आमदारांना बजावली नोटीस पाठविण्यात आली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा देखील समावेश आहे. तर जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? काँग्रेस हायकमांडकडून आमदारांवर कारवाई का करण्यात आली?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी काँग्रेसचे ११ आमदार अनुपस्थित होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नऊ आमदार वेळेत पोहोचू शकले नाहीत. याच कारणामुळे काँग्रेस हायकमांडकडून 9 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकारची चौकशी करण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोहन प्रकाश यांची नियुक्ती केली आहे. सध्या तरी कारणामुळे काँग्रेस हायकमांडकडून 9 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. आता काँग्रेस हायकमांडकडून पुढील अॅक्शन काय करण्यात येईल? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
नुकत्याच राज्यात राज्यसभा आणि विधान परिषद या दोन निवडणुका पार पडल्या. या दोन्हीही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसला. भाजपला यश मिळाले. विधान परिषद निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या दोन उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला.
त्यानंतर काँग्रेसच्या सात आमदारांची मते फुटल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या. कॉंग्रेसने देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतल आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईची मागणी केली होती.
दरम्यान, याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे ही कारवाई मागणी केली होती. तर सध्या शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावादरम्यान जे कॉंग्रेस आमदार अनुउपस्थित होते. त्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
एकनाथ शिंदेंकडून अब्दुल सत्तारांना बंडखोरीचे गिफ्ट, सत्तार म्हणाले, ‘ही मामुली गोष्ट नाही..’
…तेव्हा उद्धवसाहेब एकदाही बोलले नाहीत हा माझा आमदार आहे; बंडखोर आमदाराने पहिल्यांदाच व्यक्त केली नाराजी
वेस्ट इंडिज सिरीजमध्ये विराटचे नाव का नाही? स्वतः विराटच आहे याला जबाबदार, झाला मोठा खुलासा
इम्रान हाश्मीने कॉफी विथ करणमध्ये व्यक्त केली इच्छा, म्हणाला, मला दिपीकासोबत…