Share

bjp : ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार नाराज लवकरच भाजपमध्ये’, भाजप नेत्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ

bjp

bjp : तुम्ही आता पर्यंत अनेक बंड पाहिले आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड आख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला मोठी गळती आहे. अनेकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडली. यामुळे ठाकरे गटात अस्थिरतेचे वातावरण पाहायला मिळाले.

अशातच भाजप नेत्याने केलेल्या दाव्याने आणखीच खळबळ उडाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचा एक खळबळजनक दावा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी नुकताच केला आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात बंड होणार असल्याच बोललं जातं आहे.

जालन्यात पत्रकारांशी बोलताना दानवे यांनी हे खळबळजनक वक्तव्य केल आहे. दानवे यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी बोलताना दानवे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली आहे.

शिंदे गटातील आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या दाव्यावर बोलताना दानवे म्हणाले की, ‘शिंदेंच्या नेतृत्वाखाली या आमदारांनी वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. भाजपामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना घेण्याचं काहीच कारण नाही. आम्ही आता एकच आहोत.’

दरम्यान, पुढे बोलताना दानवे यांनी म्हंटलं आहे की, ‘शिवसेनेच्या आमदारांविरोधात पराभूत झालेल्यांना ताकद देण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. aआणि याच कारणामुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमदारांनी उठाव केला असल्याच दानवे यांनी म्हंटलं आहे.

दानवे यांनी केलेल्या दाव्याने आता एकच खळबळ उडाली असून खरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा बंड होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याच बरोबर येणाऱ्या काळात शिंदे – फडणवीस सरकार नेमकं कसं काम करणार? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या  
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी… 
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई 
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर 
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now