सोमवारी राज्याच्या प्रमुख शहरांमधील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर आले अन् त्यांनी ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात केलेल्या आंदोलनामागचा सूत्रधार हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ नावाचा तरुण होता, ही बाब समोर आल्यानंतर सोशल मीडियाचा एक घातक पैलू समोर आला. आता याच घटनेवरून राजकारण तापायला लागलं आहे. (congress leader sachin sawant criticize on bjp)
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. या घडलेल्या घटनेमागे भाजपाचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी याबाबत ट्विट करत भाजपावर शाब्दिक निशाणा साधला आहे. ‘हिंदूस्तानी भाऊ याला सोशल मीडिया वर प्रस्थापित करुन त्याला फेमस करणारी व्यावसायिक कंपनी ही भाजपाच्या संबंधित लोकांची असल्याचे, त्यांनी म्हंटले आहे.
ट्विटमध्ये सावंत म्हणतात, ‘हिंदूस्तानी भाऊ याला सोशल मीडिया वर प्रस्थापित करुन त्याला फेमस करणारी व्यावसायिक कंपनी ही भाजपा/संघाच्या संबंधित लोकांची होती. अनेक वेळा हा व्यक्ती द्वेषपूर्ण व शिवीगाळ युक्त धर्मांध वक्तव्य करीत असताना फेसबुक व इतर सोशल मीडिया त्यावर कारवाई करत नव्हते. कारण त्याला संरक्षण होते.’
हिंदूस्तानी भाऊ याला सोशल मीडिया वर प्रस्थापित करुन त्याला फेमस करणारी व्यावसायिक कंपनी ही भाजपा/संघाच्या संबंधित लोकांची होती. अनेक वेळा हा व्यक्ती द्वेषपूर्ण व शिवीगाळ युक्त धर्मांध वक्तव्य करीत असताना फेसबुक व इतर सोशल मीडिया त्यावर कारवाई करत नव्हते. कारण त्याला संरक्षण होते.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 1, 2022
दरम्यान, अखेर धारावी येथील विद्यार्थी आंदोलन आणि गर्दी प्रकरणी हिंदुस्तानी भाऊला (Hindustani Bhau) अटक करण्यात आलं आहे. धारावी पोलिसांनी काल रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांना (Student Protest) चिथावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ही कारवाई करण्यात आहे. तसेच अटक केल्यानंतर हिंदुस्तानी भाऊला नायर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते.
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
तसेच सोमवारी माध्यमांशी बोलताना हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकार या आंदोलनासाठी कारणीभूत असल्याचं मत त्याने व्यक्त केलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या
एकुलत्या एक मुलीचा गिझर मधून गॅस गळती झाल्याने मृत्यू; आईने फोडला हंबरडा
माशाने केली मगरीसोबत मोठी खेळी, असा घेतला मगरीचा जीव की पाहून बसेल धक्का; पहा व्हिडीओ
मोठी बातमी! चिथावणीखोर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला ठोकल्या बेड्या
हृदयद्रावक! १० दिवसांपासून आई बसली होती मुलीच्या कुजलेल्या मृतदेहाजवळ; नक्की घडलं तरी काय?