Share

पंतप्रधान मोदींनी देहूत सावरकरांबद्दल थाप मारली; सावकरांच्या लिखाणानेच केली पोलखोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. अशात ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देहूत आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी भाषण देत लोकांना संबोधित केलं. (congress leader on modi savarkar statement)

या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पुस्तकाचेही प्रकाशन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. पण ते सर्वात जास्त चर्चेत आले ते म्हणजे त्यांनी संत तुकारामांचे अभंग गायले. तसेच अभंग गाताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदाहरण दिले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, तेव्हा त्यांनी हातातील साखळदंडांच्या चिपळ्या केल्या आणि तुकारामांचे अभंग म्हटले होते, असे मोदींनी म्हटले. यावरुन आता काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते रत्नाकर महाजन यांनी एक पोस्ट फेसबूक पोस्ट लिहीली आहे.

सावरकर व तुकाराम… सावरकर यांच्या लिखाणात तुकाराम किंवा अन्य कोणत्याही संताचा ओझरता देखील उल्लेख नाही.त्यामुळे अंदमानात साखळदंडाच्या चिपळ्या करून तुकारामाचे अभंग ते गात होते ही निव्वळ थाप आहे, असे रत्नाकर महाजन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मस्तक माझे पायांवरी, या वारकरी संतांच्या, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली होती. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी संत तुकाराम यांच्या अभंगातील अनेक ओळी आपल्या भाषणात मांडल्या. तसेच काही उदाहरणेही दिली. आजच्या काळात या ओळी किती महत्वाच्या आहेत, हेही ते भाषणात स्पष्ट करताना दिसून येत होते.

तसेच मोदींनी भाषणात सावरकरांचाही उल्लेख केला. वीर सावरकरांना शिक्षा झाली, तेव्हा ते तुकारामांचे अभंग गात असायचे. वेगवेगळ्या पिढ्यांना तुकारांमांचे अभंग प्रेरणा राहिलेल्या आहे. ते जेलमध्ये होते, तेव्हा त्यांनी हातातील बेड्यांचा चिपळ्या म्हणून उपयोग केला होता, असे पंतप्रधानांनी भाषणात म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-
राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दानवे सुद्धा भडकले; म्हणाले, अशी वक्तव्ये करणे महाराष्ट्राचा अपमान
तिकिटासाठी पैसे नाहीत, म्हणून तरुणाने एसटीच्या पाठीमागे लटकून केला प्रवास; पाहा फोटो
पंकजा मुंडेंचा राजकीय एन्काऊंटर करण्याचा भाजपचा प्रयत्न; महाजनांनी उघड केले आतले सत्य

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now