चव्हाण – फडणवीस यांच्या भेटीनंतर आता राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याच बोललं जातं आहे. अशातच आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतं आहे.
चव्हाणांसाठी थेट दिल्लीतून सूत्र हलली असून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) हेच यामागचे सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार सुद्धा भाजपच्या गळाला लागले आहे. जर चव्हाण भाजपमध्ये आले तर 15 आमदार घेऊन यावे, अशी अट भाजपकडून ठेवण्यात आली असल्याच बोललं जातं आहे.
दरम्यान, राज्यात काँग्रेसच्या बळावर सत्ता येणे अवघड असल्याचे चव्हाणांच्या लक्षात येऊ लागले होते. सत्ता गेली तर किमान मंत्रिपद तरी आपल्याकडे असावे, या भूमिकेतून भाजपकडे चर्चेसाठी चव्हाणांनी पुढाकार घेतला. त्यानंतर दिल्लीतून सूत्र हलली. भाजपने चव्हाणांसाठी ज्योतिरादित्य शिंदे यांना मैदानात उतरवले.
याचे कारण असे की, ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव आणि अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्यात चांगले संबंध होते. आणि दोन्ही नेते मुळ काँग्रेसचेच. त्यामुळे बोलणी करायला आणखी सोपे झाले, असं आता राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे. चव्हाण यांनी किमान 15 आमदार सोबत आणावे अशी भाजपच्या वरिष्ठांची अपेक्षा असल्याच बोललं जातंय.
नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून दुसऱ्या टप्प्यातील विस्तार रखडला आहे. पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. याच पार्श्वभूमीवर आता भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट फोडण्यात येणार असल्याच बोललं जातं आहे.