एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार गेल्याने महाविकास आघाडी धोक्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी नेते आपले सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशात सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी बजावली आहे.
आमदारांनी १२ जूलैपर्यंत आपली बाजू मांडावी असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. पण तोपर्यंत शिवसेनेला बंडखोर आमदारांवर कारवाई करता येणार नाही. हे सगळं चालू असताना शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे.
या बैठकीत नामांतराच्या मुद्याने जोर धरला आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नामांतराच्या मुद्द्यावरून ठिणगी पडली असल्याचे बोलले जात आहे. पुणे शहराचे नाव बदलून जिजाऊनगर करा अशी मागणी काँग्रेसने मंत्रिमंडळात केली आहे. बऱ्याच दिवसांपासून शिवसेनेने औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव बदलण्यात यावे याची मागणी केली होती.
उद्धव ठाकरेंनी घोषणाही केली होती की, नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात येणार आहेे. काँग्रेसचीही हीच मागणी आहे. तर शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोडला बॅरिस्टर अंतुलेंचं नाव देण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे. पण त्यांनी आता पुण्याचे नाव बदलण्याचीही मागणी केली आहे.
पुण्याचे नाव बदलून जिजाऊनगर करण्यात यावं अशी काँग्रेसची मागणी आहे. दरम्यान, बैठक सुरू असताना वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख हे दोन मंत्री बाहेर पडले. ते बैठकीतून बाहेर पडल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे कारण बैठक संपलेलीच नव्हती. ते बैठकीतून बाहेर का पडले याची माहिती अदयाप मिळाळेली नाही.
काँग्रेसच्या या दोन मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत अशी अचानक एक्झिट घेतल्यानं सगळ्या आशा संपल्या आहेत का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. काही वेळानंतर वर्षा गायकवाड पुन्हा आपली कागदपत्रे घेऊन मंत्रिमंडळात सहभागी झाल्या होत्या. अनिल परब यांनी कालच सांगितलं होतं की, शिवसेनेकडून तीन महत्वाचे प्रस्ताव या मंत्रिपमंडळात मांडण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
बराच काळ डॅनीसोबत लिव्ह-इनमध्ये राहिली ‘ही’ अभिनेत्री, आता लोकांच्या नजरेपासून दूर करते ‘हे’ काम
10 जूनला जेलमधून सुटला, 15 जूनला पोलिसांकडे गेला, त्यानंतर., वाचा कन्हैयालालच्या हत्येची स्टोरी
कन्हैयालालची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना पोलिसांनी असा शिकवला धडा, पाठलाग केला अन्…
अक्षय कुमारसोबत काम का करत नाही? शाहरूख म्हणाला, मी जेव्हा झोपायला जातो तेव्हा तो..